Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact Checkतो फोटो पद्मशीला तिरपुडे यांचा नाही, चुकीचा दावा झाला व्हायरल

तो फोटो पद्मशीला तिरपुडे यांचा नाही, चुकीचा दावा झाला व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

गरीबीशी संघर्ष करत पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या पद्मशीला तिरपुडे यांचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या फोटोत पदमशीला महिला बाळाला पोटाशी घेऊन डोक्यावर दगडी खलबत्ता घेऊन उभ्या आहेत. हा फोटो त्यांचाच असून भंडारा जिल्ह्यातील पद्मशीला तिरपुडे यांनी खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास केली असाही दावा पोस्टमध्ये केला आहे.

फेसबुक

संग्रहित

Fact Check/Verification

आम्ही व्हायरल फोटोतील बाळाला पोटाशी बांधून खलबत्ते विकत असलेली महिला एमपीएससीमधून पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या पद्मशीला तिरपुडे याच आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या माध्यमातून व्हायरल फोटो शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला एका ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला. या ट्विटमध्ये कष्टकरी महिलांचे चार फोटो शेअर केले असून यात पद्मशीला तिरपुडेंच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो देखील आहे. यात म्हटले आहे की, तथाकथित बुद्धमितेचे लोक भारतीय महिलानां कुटूंब महत्वाचे की काम असा मूर्ख प्रश्न विचारतात, माझ्या प्रिय विद्वानांनो खालील फोटो बघा आणि यांच उत्तर तुम्हीच शोधा.

या ट्विटमध्ये हा फोटो नेमका कुणाचा आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली. यात डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली’ असे सांगणारी तेव्हाच्या आणि आताच्या अशा दोन छायाचित्रांसहची पोस्ट सध्या कमालीची व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, पोटाची भूक भागविण्यासाठी तिने खलबत्ते विकले नाहीत. ‘मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही’, असे खुद्द पद्मशीला तिरपुडे यांनी महाकराष्ट्र टाईम्सला सांगितले आहे.

खलबत्ते विकणारी ती महिला ही मीच आहे, असे परस्पर ठरवून अनेकांनी माझा फोटो व्हायरल केला. अनेकांनी तर माझ्या फेसबुक अकाउंटला हे फोटो टॅग केले. कुठलीही खातरजमा न करता केलेली ही कृती पूर्णत: चुकीची आहे. मला यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अजूनही त्रास होतोच आहे. पोलिस अधिकारी म्हणून काम करताना या प्रकारामुळे अडचणींनाही तोंड द्यावे लागते- पद्मशीला तिरपुडे सहाय्यक पोलिस निरीक्षक

Conclusion

बाळाला हातात घेऊन लाल खलबत्ते विकणारी महिला पीएसआय पद्मशीला तिरपुडे नाहीत, त्यांच्या नावाने हा फोटो व्हायरल होत आहे. पद्मशीला यांनी आपण कधीही खलबत्ते विकले नाहीत अशी माहिती दिली आहे. यावरुन हेच सिद्ध होते की चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Source

महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/psi-padmashila-tirpude-clarified-about-viral-photo/articleshow/78812912.cms

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular