Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या...

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेले हिंगलाज मंदिर पाकिस्तानातील सिंध प्रांतात पाडण्यात आले.

Fact
व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, सिंधमध्‍ये पाडलेले बांधकाम सुरू असलेले मंदिर ऐतिहासिक नव्हते.

अलीकडेच, अनेक प्रमुख प्रसारमाध्यमांनी शेजारील देश पाकिस्तानची एक बातमी प्रकाशित केली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की पाकिस्तान सरकारने युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केलेले सिंध प्रांतातील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडले आहे. केंद्र सरकारचे मंत्री गिरिराज सिंह यांनीही हा दावा केला आहे.

तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थार पारकर जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आलेल्या हिंगलाज मंदिराचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले होते. या बांधकामाधीन मंदिराचा ना युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला होता ना ते ऐतिहासिक होते. ऐतिहासिक हिंगलाज मंदिर सिंध प्रांतात नसून बलुचिस्तान प्रांतातील हिंगोली राष्ट्रीय उद्यानात आहे.

व्हायरल दावा देखील एका व्हिडिओसह शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये काही लोक सुरक्षा कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ‘जय माता दी’ आणि ‘हिंगलाज माता की जय हो’ च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत. यावेळी तेथे उपस्थित काही लोक घरे पाडण्यासाठी फावडे व इतर साधने हातात धरलेले दिसले.

हिंदी न्यूज वेबसाईट लाईव्ह हिंदुस्तानने 24 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या वेबसाईटवर हा व्हायरल दावा बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की “पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेले आणि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेले हिंगलाज माता मंदिर पाडण्यात आले आहे.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: Live Hindustan

याव्यतिरिक्त, इंडिया टीवीरिपब्लिक टीवीन्यूज़ 24 आणि  एशियानेट न्यूज़ यांनीही ऐतिहासिक हिंगलाज मंदिर तोडले जात असल्याचा व्हायरल दावा शेअर केला आहे.

त्याच वेळी, हा दावा X (पूर्वीचे ट्विटर) वर देखील व्हायरल आहे. भारत सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनीही हा व्हायरल दावा शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “विकास आणि पुनर्निर्माणाच्या नावाखाली युनेस्कोने सूचीबद्ध केलेले हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानमध्ये पाडण्यात आले, भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष समुदायाने त्याविरोधात आवाज उठवला नाही. भारतातही अनेक मशिदी अतिक्रमण करून बांधल्या गेल्या आहेत… याही विकासात अडथळे आहेत.”

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: X/girirajsinghbjp

याशिवाय, हा दावा पाचजन्यसह इतर अनेक व्हेरीफाईड X खात्यांद्वारे देखील शेयर केला गेला आहे, जो तुम्ही येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: X/epanchjanya

Fact Check/Verification

Newschecker ने व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित किवर्ड च्या मदतीने X वर सर्च केला. आमहाला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी 23 नोव्हेंबर 2023 ला केलेले एक ट्विट सापडले.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: X/DanishKaneria61

आपल्या ट्विटमध्ये, कनेरियाने घोषणाबाजी करत असलेल्या लोकांचा व्हिडिओ शेअर करताना दावा केला होता की, “मीरपूर विशेष न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून पाकिस्तान सरकारने मिठी, थारपारकर, सिंध प्रांतातील हिंगलाज माता मंदिर पाडले आहे”.

आम्ही दानिश कनेरियाच्या वरील ट्विटची चौकशी सुरू केली तेव्हा आम्हाला पाकिस्तानी मीडिया आउटलेट ARY News चे पत्रकार संजय साधवानी यांनी 23 नोव्हेंबरला केलेले ट्विट आढळले.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: X/sanjaysadhwani2

पत्रकार संजय साधवानी यांनी कनेरियाच्या वरील ट्विटचा हवाला देताना लिहिले की, “ना ते ऐतिहासिक मंदिर होते, ना धार्मिक स्थळ. या जमिनीवर मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या पक्षाच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. यामध्ये दोन्ही पक्ष हिंदू आहेत. एका पक्षाने हे प्रकरण न्यायालयात नेले, त्यानंतर हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.”

यानंतर आम्ही पत्रकार संजय साधवानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला या प्रकरणातील न्यायालयाचे आदेश दिले, जे मिरपूर खास अतिक्रमण विरोधी न्यायाधिकरणाने 7 डिसेंबर 2022 रोजी जारी केले होते. अरुण विरुद्ध पारू मल या खटल्यात न्यायालयाने सरकारी जमिनीवर कब्जा करून उभारले जाणारे मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य

न्यायालयाच्या आदेशात मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात मिठी येथील खत्री वस्तीत राहणाऱ्या अरुण लोहाणा नावाच्या व्यक्तीने पारू मल आणि इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्या घरासमोरील सरकारी जागेवर दुसऱ्या पक्षाचे लोक बेकायदा बांधकाम करत असून त्यामुळे आपल्या मालमत्तेचेही नुकसान होत असल्याची तक्रार अरुण यांनी केली होती. त्याचवेळी, या प्रकरणात, अन्य पक्षाने ही जमीन त्यांच्या पूर्वजांची जमीन असल्याचे सांगून मंदिर बांधण्याचा दावा सार्थ ठरवला होता. आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी धर्मशाळा, विहीर आणि मंदिर बांधल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य

या प्रकरणी स्थानिक तहसीलदारांनीही आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “ज्या जमिनीवर दुसऱ्या पक्षाने सीमाभिंत बांधून मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला ती सरकारी जमीन आहे”. त्यानंतर न्यायालयाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य

यानंतर आम्ही अरुण लोहाना यांचे वकील आणि त्यांचे वडील हरीश चंदर लोहाना यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. हरीश यांनी आम्हाला सांगितले की, “स्वातंत्र्यापूर्वी, ही जमीन थारपारकर जिल्ह्याच्या उपायुक्तांनी दुसऱ्या पक्षाच्या पूर्वजांना विहीर बांधण्यासाठी दिली होती. ही विहीर अनेक वर्षे वापरात राहिली. मात्र गेल्या काही वर्षात वापर न झाल्याने ती जीर्ण अवस्थेत पडली, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे विहीर पूर्णपणे भरली. विहीर भरल्यानंतरही लोकांनी त्या ठिकाणी कचरा टाकणे सुरूच ठेवले. पण 2022 मध्ये दुसऱ्या पक्षाने ती जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्याभोवती भिंत बांधण्यास सुरुवात केली.

हरीशने पुढे सांगितले की, “भिंतीच्या बांधकामामुळे त्यांच्या घरासमोरील रस्ता अरुंद झाला आहे. याबाबत त्यांनी महसूल अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता अधिकार्‍यांनी कारवाई करत ते बांधकाम पाडले. मात्र, काही दिवसांनी त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केले. आधी चहूबाजूंनी भिंत बांधली आणि मग मधोमध ध्वज लावून हिंगलाज मातेचे चित्र लावले. या बांधकामामुळे आम्हाला आमच्या घरी जाण्यास अडचणी येत असल्याने आम्ही न्यायालयात धाव घेतली. सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर 23 नोव्हेंबर 2023 रोजी सदर बांधकाम पाडण्यात आले.

तपासादरम्यान, हरीशने या ठिकाणी बांधकाम होण्यापूर्वीचे चित्र, 2022 मध्ये झालेल्या बांधकामाचे छायाचित्र आणि न्यायालयाच्या आदेशानंतर नुकतेच बांधकाम पाडल्याचे चित्र आम्हाला पाठवले. आपण ते खाली पाहू शकता. बांधकामापूर्वीच्या छायाचित्रांमध्ये ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी कचरा पडलेला दिसतो.

तपासादरम्यान, आम्हाला या प्रकरणासंदर्भात एसएसपी थारपारकर अली मर्दान खोसो यांनी जारी केलेला व्हिडिओ देखील सापडला आहे. या व्हिडिओमध्ये एसएसपी थारपारकर असे म्हणताना दिसत आहेत की, “अरुण कुमार लोहाणा नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या प्रकरणात अतिक्रमण विरोधी न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार अवैध अतिक्रमण पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणातील दुसरा पक्षही हिंदू असून तो खत्री समाजाचा आहे.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: FB/thar.police

आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, मिठी येथे पाडण्यात आलेले हिंगलाज मंदिर हे ऐतिहासिक मंदिर नसून त्याचे बांधकाम काही काळापूर्वी सार्वजनिक जमिनीवर सुरू करण्यात आले होते, तर ऐतिहासिक हिंगलाज माता मंदिर हे बलुचिस्तानच्या लास बेला जिल्ह्यात आहे. हे हिंगोली राष्ट्रीय उद्यानात आहे, जे सिंधच्या मिठी शहरापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: Google Maps

यानंतर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेल्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील त्या ठिकाणांची माहिती मिळवली. युनेस्कोच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सिंधमधील मोहेंजोदारो आणि थट्टा येथील माकली या दोन ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: UNESCO

यावेळी, आम्हाला असेही आढळून आले की बलुचिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर अजूनही युनेस्कोच्या प्रलंबित यादीत आहे आणि जागतिक वारसा यादीत समाविष्ट नाही.

Fact Check: पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडल्याचा दावा खोटा आहे, जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy: UNESCO

बलुचिस्तानमधील हिंगलाज माता मंदिर हे हिंदूंच्या 52 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराची पत्नी सती हिच्या आत्मदहनानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग येथेही पडला होता. हे मंदिर नानी मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

तपासादरम्यान, आम्ही बलुचिस्तानच्या ऐतिहासिक हिंगलाज मंदिरात तोडफोड केली आहे का, याचाही शोध घेतला. यासाठी आम्ही मंदिराचे सरचिटणीस वेरसिमल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या ऐतिहासिक मंदिरात कोणत्याही प्रकारची तोडफोड करण्यात आलेली नाही. पाडण्यात आलेले हिंगलाज मंदिर सिंधमधील असून ते ऐतिहासिक मंदिर नव्हते. जमिनीच्या वादातून मंदिर पाडण्यात आले आहे.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, सिंध प्रांतातील जमिनीच्या वादामुळे पाडण्यात आलेले हिंगलाज मंदिर हे ऐतिहासिक किंवा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट नाही. वास्तविक ऐतिहासिक हिंगलाज मंदिर बलुचिस्तानच्या हिंगोली राष्ट्रीय उद्यानात आहे.

Result: False

Our Sources
Pak Journalist Sanjay Sadhwani X Account: Tweet on 23rd Nov 2023
Mirpurkhas Anti-Encroachment Tribunal Order
Photos of location from Pak Advocate Harish Chander
Tharparkar Police FB Account: Video of SSP on 27th Nov 2023
UNESCO website: Information about sites of Pakistan  
Telephonic Conversation with Pak Advocate Harish Chander
Telephonic Conversation with Hinglaj Temple Balochistan Committee Member Versi Mal


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी आणि इंग्रजीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले आहे. ते येथे आणि येथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular