Friday, November 7, 2025

Fact Check

आईच्या निधनानंतर मुंडन केल्याचे सांगत व्हायरल झालेला पीएम मोदींचा फोटो बनावट आहे

banner_image

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान केस, दाढी आणि मिशाशिवाय दिसत आहेत. या चित्रासोबत असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू विधींचे पालन करून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर मुंडन करून घेतले.

आईच्या निधनानंतर हिंदू रीती रिवाज पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडन करून घेतले.
Courtesy: Facebook/NationWithModi
आईच्या निधनानंतर हिंदू रीती रिवाज पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडन करून घेतले.
Courtesy: Twitter@ajayhdsharma

हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर हजारो जणांनी शेअर केला आहे. अनेकजण व्हाट्सअप वरही हे चित्र शेयर करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनानंतर जिथे एकीकडे सर्व विरोधी पक्षांचे नेते शोक व्यक्त करत होते, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे एक नेते आयपी सिंह यांनी एक वक्तव्य केले, ज्यानंतर त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला गेला. आयपी सिंह यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना अखिलेश यादव यांच्याशी केली.

त्यांनी लिहिले की, वडिलांच्या मृत्यूनंतर अखिलेश यादव यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि हिंदू संस्कारांचा आदर करत तेराव्यापर्यंत शांती पठण केले. मात्र आईच्या निधनानंतर सुतक असतानाही मोदींनी सरकारी कार्यक्रमात सहभागी होऊन हिंदू रीती रिवाजांचा अपमान केला. आयपी सिंह यांच्या या ट्विटनंतर पीएम मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल चित्रावर रिव्हर्स इमेज शोध घेतल्यावर, आम्हाला झी बिझनेसची एक बातमी सापडली. या बातमीत असलेले छायाचित्र पाहून हे व्हायरल झालेले छायाचित्र एडिट केलेले असल्याचे स्पष्टपणे समजते. झी बिझनेसच्या वृत्तात असलेल्या छायाचित्रात पीएम मोदींच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर केस दिसत आहेत. सॉफ्टवेअरच्या मदतीने या चित्रावर छेडछाड करण्यात आली आहे.

आईच्या निधनानंतर हिंदू रीती रिवाज पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडन करून घेतले.
Courtesy: Viral Pic & Zee Business

मूळ चित्र इतर अनेक रिपोर्ट्स मध्येही पाहायला मिळाले आहे, जिथे ते पीएम मोदींशी संबंधित बातम्यांमध्ये वापरले गेले आहे. शोध घेतल्यावर आम्हाला असेही कळले की गेल्या दोन वर्षांपासून हे बनावट चित्र इंटरनेटवर फिरत आहे. हे Reddit आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यापूर्वी अनेकदा शेअर केले गेले आहे.

Conclusion

आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, केस, दाढी आणि मिशा नसलेल्या स्थितीतील पंतप्रधान मोदी दाखवणारा हा फोटो बनावट आहे. तसेच, आईच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांनी मुंडन केले की नाही, यावर आम्ही कोणतेही भाष्य केलेले नाही.

Rating: Altered Media

Our Sources


Report of Zee Business, published on April 30, 2018


Report of The Economic Times, published on December 16, 2017

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,187

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage