Authors
Claim
मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे.
Fact
व्हायरल फोटो ४ वर्षे जुना असून दिल्लीत पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी झालेला रिक्षाचालक सरबजीत सिंग याचा आहे. संबंधित व्यक्ती शेतकरी नसून शेतकरी आंदोलनाशी त्याचा काहीच संबंध नाही.
दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच क्रमाने शेतकऱ्यास मारहाण म्हणून एक फोटो व्हायरल झाला आहे. मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे. असा दावा या व्हायरल फोटोच्या माध्यमातून केला जात आहे.
Fact Check/ Verification
या दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही व्हायरल चित्रावर गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च घेतला. आम्हाला @SikhSangarsh या X खात्याने १७ जून २०१९ रोजी केलेले एक ट्विट मिळाले. यामध्ये व्हायरल चित्र उपलब्ध आहे. मात्र त्याची कॅप्शन वेगळी आढळली.
“मुखर्जी नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर एका शीख ऑटो चालकाला आणि त्याच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.” अशी कॅप्शन वाचायला मिळाली. यावरून हा फोटो शेतकरी आंदोलनाचा नसून दिल्ली येथील वेगळ्या घटनेचा असल्याचे निदर्शनास आले.
यावरून सुगावा घेऊन आम्ही कीवर्ड सर्च केले असता, आम्हाला या घटनेशी संबंधित बातम्याही वाचायला मिळाल्या. १७ जून २०१९ रोजी टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ रिपोर्टमध्ये या घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
“शीख ड्रायव्हरने पोलिस व्हॅनला धडक दिली आणि त्याच्यात वाद झाला. चालकाने त्याच्याकडे असलेल्या किरपाणने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मुलाला रस्त्यावर अमानुष मारहाण केली.” असे या रिपोर्टमध्ये आम्हाला वाचायला मिळाले.
द ट्रिब्यून नेही १७ जून २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्येही पोलिसांशी वाद घातल्यामुळे सरबजीत सिंग आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी मारहाण केल्याच्या घटनेबद्दल आम्हाला वाचायला मिळाले.
यावरून जुन्या घटनेचा फोटो शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल होत असलेला फोटो ४ वर्षे जुना असून दिल्लीत पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी झालेला रिक्षाचालक सरबजीत सिंग याचा आहे. संबंधित व्यक्ती शेतकरी नसून शेतकरी आंदोलनाशी त्याचा काहीच संबंध नाही हे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Tweet made by @SikhSangarsh on June 17, 2019
News published by TOI on June 17, 2019
News published by The Tribune on June 17, 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा