Wednesday, November 20, 2024
Wednesday, November 20, 2024

HomeFact CheckFact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून...

Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते.
Fact

हे औषध प्लेटलेटची संख्या वाढवू शकते परंतु केवळ 48 तासांत डेंग्यू बरा करू शकत नाही.

कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते, असे सांगणारा दावा व्हायरल आहे. डेंग्यूची प्रकरणे वाढत असताना, एक औषध अवघ्या 48 तासांत हा आजार बरा करू शकते असा दावा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कॅरिपिल या कॅप्सुलची प्रतिमा एका संदेशासह शेअर केली जात आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘हे एक औषध आहे जे 48 तासांत डेंग्यू बरा करते. हे मोफत उपलब्ध आहे @अंतहकरण, जागरूकता निर्माण करा, यापासून एखाद्याला मदत होऊ शकेल’, या संदेशासोबत काही मोबाईल नंबर दिले गेले आहेत.

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.

Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून घ्या सत्य
WhatsApp Viral Message

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही सर्वप्रथम मेसेजमधील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधला. मात्र यापैकी एकही मोबाईल सुरु नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. दरम्यान मेसेजमध्ये असलेल्या माहितीवरील किवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला असता हा मेसेज 2016 पासून इंटरनेटवर घिरट्या घालत असल्याचे आम्हाला आढळले.

Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून घ्या सत्य
Courtesy: X@DrAbdulJabbar4u

डेंग्यू ताप हा डासांमुळे होणारा विषाणूमुळे पसरणारा उष्णकटिबंधीय रोग आहे. संसर्ग झाल्यानंतर तीन ते चौदा दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. यात जास्त ताप, डोकेदुखी, उलट्या, स्नायू आणि सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश असू शकतो. दरम्यान या आजारावर तातडीने उपचार करण्याचा दावा होत असलेली संबंधित टॅब्लेट किंवा कॅप्सूल अस्तित्वात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, आम्ही Google वर शोध घेतला. आम्हाला 1mg.com ही औषध विकणारी वेबसाइट मिळाली. त्यावरील वर्णनानुसार, या औषधामध्ये पपईचा अर्क आहे जो प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करतो.

Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून घ्या सत्य
Screengrab of 1mg.com

आम्हाला ‘डेंग्यूशी लढण्यासाठी पपईच्या पानांचा वापर कसा करावा’ या विषयावर एक लेख सापडला, ज्यात म्हटले आहे की पपईच्या पानांमध्ये फिनोलिक संयुगे, पपेन आणि अल्कलॉइड्स असतात आणि हे पोषक घटक हेल्दी अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

पण अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा होणे शक्य आहे का? याची पुष्टी करण्यासाठी, आम्ही आयुर्वेदिक तज्ञ डॉ. भूषण सुतार यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्या मते, “पपईची पाने डेंग्यूने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या वाढवू शकतात, परंतु रुग्णाला 48 तासांत पूर्णपणे बरे करणे अजिबात शक्य नाही.”

या औषधासाठी पूर्णपणे समर्पित वेबसाइटनुसार, कॅरिपिल टॅब्लेट ही बंगलोरच्या micro lab द्वारे निर्मित हर्बल गोळी आहे. वेबसाइटवर नमूद केलेला विहित डोस 4 ते 5 दिवसांचा आहे. ही वेबसाइट केवळ 48 तासांत डेंग्यू बरा करण्याचा दावा करत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनेही डेंग्यू बरा करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध सुचवलेले नाही.

Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते? जाणून घ्या सत्य
WHO Website

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात संबंधित औषध प्लेटलेट्स वाढविण्यास मदत करीत असले तरी डेंग्यू 48 तासात बरा करू शकत नाही. तसेच डेंग्यू सारखा आजार इतक्या तात्काळ बरे करणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.

Result: Partly False

Our Sources
Google Search
Information given by 1mg.com
WHO Website
Conversation with Dr. Bhushan Sutar


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular