Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. इटलीतील डाॅक्टरांनी कोरोना हा व्हायरस नसून बॅक्टेरिया असल्याचा दावा व्हायरल झाला तर कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ हाजी अली दर्ग्यात पोहचले असल्याचे व इतरही दावे या आठवड्याता मोठया प्रमाणात व्हायरल झाले. हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.
कोरोना व्हायरस नाही तर बॅक्टेरिया असल्याचा इटलीतील डाॅक्टरांचा दावा
इटली जगातील पहिला असा देश आहे की जिथे कोविड-19 मृत शरीराचे पोस्टमार्टम केले गेले आहे. व्यापक तपासणीनंतर कोविड-19 हा कोरोना व्हायरसच्या रुपात नसल्याचे सत्य समोर आहे. मात्र पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कंगणा रानौतने अबू सालेमच्या भावासोबत फोटोशूट केल्याचा दावा
अंडरवर्ल्ड डाॅन आबू सालेम सारख्या दिसणा-या व्यक्ती सोबत कंगणा रानौतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, आबू सालेमच्या भावासोबत कंगणा रानौतचा फोटो आहे. मात्र पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
बुलढाण्यात शिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला मारहाण केल्याचा दावा
शिवसैनिकांनी बॅंक मॅनेजरला मारहाण केली आहे. या दाव्याने व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हीच का लोकशाही असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. पडताळणीत शिवसैनिकांनी नाही तर युवा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा
अमिताभ बच्चन यांनी कोरानावर मात केल्यावर हाजी अलीचे दर्शन घेतल्याचा दावा
अमिताभ बच्चनने कोरोनामुक्त झाल्यानंतर हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर चढविली असल्याचा दाव्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पडताळणीत अमिताभ बच्चन यांचा नऊ वर्षापूर्वीचा अजमेर दर्गा येथील फोटो आत्ताचा हाजी अली येथील असल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला असल्याचे आढळले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.