Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हरवलेला दोन वर्षीय मुलगा मुंबईच्या सीएसएमटी (व्हीटी) रेल्वेस्टेशनवर सापडला असून संपर्क साधा.
Fact
सदर मुलाला आठ महिन्यांपूर्वीच त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले असून अकारण मेसेज पसरविण्यात येत आहे.
अवघ्या दोन वर्षांचा मुलगा मुंबईच्या सीएसएमटी रेल्वेस्टेशनवर सापडला असून तो नाशिक भागातील असू शकतो. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
हाच दावा आम्हाला ट्विटरवरही पाहायला मिळाला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“नमूद मुलगा नामे-श्रावण ज्ञानेश्वर बागुल वय 2 वर्षे हा सीएसएमटी रे स्टेशन मेनलाईन येथे विनापालकाशिवाय मिळून आला आहे माहिती मिळालेस 02267455770 किंवा 8291272999 ठाणे अंमलदार यांना संपर्क करणे : हा मुलगा नाशिक चा आहे नाशिक ला आप आपल्या ग्रुप मध्ये ग्रुप मध्ये send करा” असे हा मेसेज सांगतो.
आम्ही व्हायरल मेसेज संदर्भात किवर्ड सर्च करून पाहिला. आम्हाला यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
मेसेज मध्ये लिहिण्यात आलेला मोबाईल क्रमांक ठाणे अंमलदार यांचा असल्याचे आम्हाला वाचायला मिळाले. आम्ही 8291272999 या संबंधित क्रमांकावर कॉल केला. हा क्रमांक आबासाहेब केंगार या पोलीस अंमलदार यांचा असल्याचे लक्षात आले. आम्ही त्यांना संबंधित मुलांसंदर्भात माहिती विचारली. सर्वप्रथम या पोस्टने आपल्याला प्रचंड मनस्ताप होत असल्याचे सांगून त्यांनी पुढील माहिती दिली.
आबासाहेब केंगार हे सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात ए एस आय पदावर कार्यरत आहेत. “लोहमार्ग, मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानक अर्थात व्हीटी स्टेशन वर श्रावण ज्ञानेश्वर बागुल हा दोन वर्षीय मुलगा आठ महिन्यांपूर्वी सापडला होता. तो नाशिक जवळील गावातील असून त्याला आई नाही. वडिलांसोबत प्रवास करीत असताना तो हरवला. नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर आठ महिन्यांपूर्वीच ही पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. दरम्यान एकाच दिवसात त्याचे आजोबा, मामा आणि इतर नातेवाईक आले. फोटोवरून ओळख पटविण्यात आल्यानंतर इतर पडताळण्या करून त्या मुलाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.” अशी माहिती त्यांनी न्यूजचेकरशी बोलताना दिली.
आबासाहेब केंगार यांनी, “ही घटना आठ महिन्यापूर्वी झाली असली तरी आजही यासंदर्भात चौकशीचे फोन येतात. फोन करणाऱ्यांना आम्ही सांगतो कि मुलगा पालकांकडे सुखरूपपणे सुपूर्द केला आहे. पण पुन्हा पुन्हा फोन येतच राहतात. याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.”
दरम्यान यापुढे कुणीही ही पोस्ट व्हायरल करू नये. असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा चुकीचा संदर्भ लावून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर मुलगा आठ महिन्यापूर्वी हरवला होता आणि सापडला आहे.
Our Sources
Conversation with ASI Abasaheb Kengar, CSMT Railway Police Station
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
October 19, 2024
Saurabh Pandey
March 22, 2024
Runjay Kumar
February 29, 2024