Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले? येथे वाचा...

Fact Check: उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले? येथे वाचा सत्य

Claim
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले.

Fact
हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणादरम्यान काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय लष्करातील जवान औरंगजेबचा उल्लेख करत होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबचा भाऊ असा उल्लेख केल्याचा दावा शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे औरंगजेबच्या शौर्याचे कथन करताना म्हणतात, “जर मी आता म्हणालो की तो माझा भाऊ होता, तर तुम्ही म्हणाल की त्याचे नाव काय होते ते तुम्हाला माहीत आहे? मी औरंगजेब असे सांगेन. तो धर्माने मुस्लिम असेल, पण त्याने आपल्या देशासाठी बलिदान दिले.”

Fact Check: उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले? येथे वाचा सत्य
Courtesy: Twitter@SahabaRathaura

Fact Check/ Verification

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने ट्विटरवर शोध घेतला. आम्हाला TV9 चे पत्रकार कृष्णा सोनारवाडकर यांचे एक ट्विट सापडले, त्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केलेल्या युजरला कोट ट्विट केले आहे. “2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब नावाचा भारतीय जवान शहीद झाला. रायफलमॅन औरंगजेब यांचे 14 जून 2018 रोजी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे या शहीद औरंगजेबबद्दल बोलत आहेत.” असे त्यात वाचायला मिळाले.

Fact Check: उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले? येथे वाचा सत्य
Courtesy:Twitter@krishnasonarwa1

त्याची मदत घेऊन आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. आम्हाला 19 फेब्रुवारी रोजी ‘दैनिक भास्कर’ वेबसाइटवर प्रकाशित झालेला एक रिपोर्ट सापडला, ज्यानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर भारतीय समाजाशी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला, तसेच उत्तर भारतीय समाज आणि मुस्लिमांशी आपले कोणतेही भांडण नसल्याचे सांगितले. काश्मीरमध्ये देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तीचे नाव औरंगजेब असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर आम्ही यूट्यूबवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शोधला. ABP MAJHA च्या YouTube चॅनलवर 19 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आम्हाला आढळला. व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे 14 मिनिटे 57 सेकंदावर म्हणतात, “ही तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जी तुम्ही कदाचित विसरला असाल किंवा तुम्ही त्याबद्दल वाचलेही नसेल. आमचा एक सैनिक काश्मीरमध्ये होता आणि तो सुट्टी घेऊन कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जात होता. तो सुटी घेऊन एकटाच जात असल्याचे दहशतवाद्यांना समजले, त्यामुळे त्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. काही दिवसांनी, त्याचा मृतदेह कुठेतरी छिन्न विछिन्न परिस्थितीत सापडला. तो आमचा होता की नाही? ज्याने देशासाठी बलिदान दिले आहे. आता मी म्हणालो की हो, तो माझा भाऊ होता, तर तुम्ही म्हणाल, पण त्याचे नाव काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचे नाव औरंगजेब होते. धर्माने तो मुस्लिम असेल, पण त्याने आपल्या देशासाठी बलिदान दिले. भारत माता जिचा जयजयकार करतो, त्याने या मातेसाठी जीव दिला. तो आपला भाऊ नव्हता का? तो आपला भाऊ आहे.”

याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळाला.

विशेष म्हणजे, जून 2018 मध्ये ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब या भारतीय लष्कराच्या जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, औरंगजेबचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला आहे. राष्ट्रीय रायफल्सचे शहीद जवान औरंगजेब यांना भारतीय लष्कराकडून शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

Conclusion

त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात औरंगजेब नावाच्या भारतीय लष्कराच्या शहीद जवानाचा उल्लेख केला होता, जो मुघल शासक औरंगजेबाचा असे सांगत खोटा दावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Tweet by TV9 Marathi Journalist Krishana Sonwarwadkar on February 28, 2023

Report Published by Dainik Bhaskar on February 19, 2023

Youtube Video uploaded by ABP Manjha on February 19,2023

Video Uploaded by Uddhav Thackeray’s official Facebook Page.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular