Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact Checkगोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
यूपीच्या संभळमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.
Fact

हा व्हिडिओ 2019 मध्ये गोरखपूरमध्ये CAA विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पोलिस जमावावर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ यूपीच्या संभळमध्ये घडलेला हिंसाचार म्हणून शेअर केला जात आहे.

नुकतेच संभळच्या स्थानिक न्यायालयाने शहरातील शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. रविवारी सकाळी पाहणी पथक मशिदीत पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी जागा रिकामी करण्याचा प्रयत्न केला असता जमावात उपस्थित काही बेशिस्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावावर बळाचा वापर करत अनेकांना ताब्यात घेतले. या संघर्षात आतापर्यंत सुमारे 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ 1 मिनिट 9 सेकंदाचा आहे, ज्यामध्ये पोलिस जमावावर जबरदस्त बळाचा वापर करताना दिसत आहेत. यावेळी जमाव तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल दावा कॅप्शनसह शेअर केला गेला आहे, “या व्हिडिओमध्ये संभळमधील @Uppolice ची क्रूरता पहा. आंदोलक कोणावर दगडफेक करत नव्हते किंवा हिंसा करत नव्हते. असे असतानाही पोलिसांनी लाठीचार्ज केला. हिंसाचार तर झालाच ना! हिंसाचार झाला आहे का?”

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल
Courtesy: X/WasimAkramTyagi

Fact Check/ Verification

न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज शोध घेतला आणि X खात्यावरून 31 डिसेंबर 2019 रोजी पोस्ट केलेला व्हिडिओ सापडला. त्यात व्हायरल व्हिडीओमधली दृश्ये होती. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा आहे, जिथे पोलिसांनी CAA विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज केला.

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल
Courtesy: X/imMAK02

यानंतर, जेव्हा आम्ही वर दिलेल्या माहितीच्या आधारे कीवर्ड शोधले तेव्हा आम्हाला ETV Bharat च्या वेबसाइटवर 20 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट आढळला. यात असे म्हटले आहे की, 20 डिसेंबर 2019 रोजी शुक्रवारच्या नमाजनंतर मशिदीतून बाहेर पडलेल्या उपासकांनी CAA विरोधात निदर्शने केली आणि यादरम्यान ते नखास परिसरात जमा झाले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केला.

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

या रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या कोनातून शूट केलेल्या व्हिडिओ रिपोर्टचाही समावेश आहे, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओसारखी दृश्ये देखील होती. व्हिडिओ रिपोर्टमध्ये निवेदन देताना गोरखपूरचे एसएसपी म्हणाले की, पोलिसांनी आधी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जमावात उपस्थित काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

यानंतर, आम्ही Google Maps स्ट्रीट व्ह्यूवर व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये देखील शोधली. यावेळी, आम्हाला गोरखपूरच्या नखास रोड भागात ते दृश्य आढळले, जे खाली पाहिले जाऊ शकतात.

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल झालेला व्हिडिओ संभळमध्ये नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराचा नसून सुमारे पाच वर्षांपूर्वी गोरखपूरमध्ये CAA विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा आहे.

Result: False

Our Sources
Post by an X account on 31st Dec 2019
Article Published by ETV Bharat on 20th Dec 2019
Visuals Available on Google Street View 

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular