Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
स्मशानभुमीतील प्रेतांच्या रांगेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, व्हिडिओ जळगावच्या स्मशानभुमीतील प्रेतांचा आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत, तसेच मृत्युंची संख्या देखील वाढत आहेत.
याच दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला गेला आहे की हा व्हिडिओ जळगावमधील आहे. यात जमिनीवर अनेक प्रेतं रांगेत ठेवलेली दिसत आहेत. शिवाय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांची गर्दी देखील दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की,
आतापर्यंत आपण रेशनसाठी रांगेत उभा राहिला आहात . गॅस टाकीसाठी रांग ..उन्हाळ्यात पाण्यासाठी रांग ..पाहिली असेलच ..पण, महाराष्ट्रातील जळगाव येथील स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रांगेत आहेत…! कोरोनाचा हाहाकार
crowdtangle वर या पोस्टसंदर्भांत 13 इन्ट्रेक्शन झालेले आढळून आले आहेत तर बाबूसाहब छपरा वाले फेसबुक पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळालेले आहेत तर अनेक यूजर्सनी ही पोस्ट शेअर केल्याचे आढळून आले आहे.
फेसबुकवर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहे. यात देखील हा व्हिडिओ जळगावचा असल्याचे म्हटले आहे.

याव्यतिरिक्त ही व्हायरल फेसबुक पोस्ट इथे, इथे आणि इथे पाहू शकता.
कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे जळगावात अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्या आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला व्हायरल व्हिडिओ नेमका जळगावचाच आहे के तपासून पाहण्यासाठी आम्ही काही किवर्डचा वापर केला मात्र आम्हाला जळगावमध्ये स्मशानात प्रेतांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ आढळून आला नाही किंवा माध्यमांत बातमी दिसून आली नाही.
यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला असता आम्हाला एका फेसबुक पोस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की, हा व्हिडिओ गुजरातमधील आहे.

यानंतर आम्ही Google वर काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता गुजरात एक्सक्लुझिव्ह या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या लेखात हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 5 एप्रिल रोजी हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे आणि त्यात असे म्हटले आहे की, गुजरातच्या सूरत येथील अश्विनीकुमार स्मशानभूमीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लांबलचक रांग लागली आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

Gujarat Exclusive या युट्यूब चॅनलवर देखील हा व्हिडिओ सुरतमधील अश्विनीकुमार स्मशानभुमीतील असल्याचे म्हटले आहे.
सूरतच्या आश्विनीकुमार स्मशानभुमीत कोरोना ने मृत झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत असल्याचा आणखी एक व्हिडिओ आम्हाला आढळून आला. यात अनेक प्रेते रांगेत ठेवली असल्याचे दिसत आहेत तर त्यांचे नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, स्मशानात प्रेतांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ जळगावमधील नसून गुजरातमधील सुरत शहरातील अश्विनीकुमार स्मशानभुमीतील आहे. तो महाराष्ट्राच्या नावाने चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Read More : शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का?
| Claim Review: जळगावमधील स्मशानभुमीत प्रेतांची रांग Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
Gujarat Exclusive- https://gujaratexclusive.in/surat-ashwini-kumar-cemetery/
S9 NEWS – GUJARAT- https://www.youtube.com/watch?v=uwStIkdltr0
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025
JP Tripathi
October 9, 2025