Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली.
Fact
दिल्ली येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ दिशाभूल करीत व्हायरल होत आहे.
चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असे सांगत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे. आम्हाला हा दावा X वर मिळाला.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हिडिओमध्ये डोक्यावर टोपी घातलेले काही नागरिक पोलिसांना मारहाण करताना दिसत आहेत. “काल मुंबईत पोलिसांनी चालान जारी केले तेव्हा मुस्लिमांनी त्यांना मारहाण केली. “हे कायद्याला आव्हान आहे. भविष्यात भारतात काय घडणार आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. देशाचे नेतृत्व कोण करणार? आणि प्रत्येकाचे भविष्य काय असेल?” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल केला जात आहे.
YouTube वर “mob,” “assault,” आणि “2 traffic police” या कीवर्डच्या शोधामुळे आम्हाला NDTV द्वारे १४ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओ रिपोर्टकडे नेले. व्हायरल व्हिडिओची छोटी आवृत्ती दाखवून रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “दोन रहदारी पोलिसांना मारहाण. ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी येथे हेल्मेट न घातल्याबद्दल आणि ट्रिपल सीट बाईक चालविल्याबद्दल तीन जणांना बाईकवरून खाली उतरवल्यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली.”
यानंतर, आम्ही Google वर “दिल्ली,” “ट्रॅफिक कॉप ॲसॉल्ट” आणि गोकुळपुरी” हे शब्द शोधले ज्यात जुलै २०१५ मधील या घटनेची माहिती देणारे अनेक रिपोर्ट पाहायला मिळाले. जे येथे, येथे आणि येथे वाचता येतील.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसने या घटनेबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, “आम्ही शाहनवाज (22), त्याचा भाऊ आणि त्यांचे वडील सगीर अहमद (65) यांना शारीरिक हल्ला केल्याच्या आरोपाखाली आणि सार्वजनिक सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याच्या आरोपाखाली अटक केली. या तिघांनी इतर काही जणांसह वाहतूक पोलिस मनोज आणि जय भगवान यांना मारहाण केली.
१३ जुलै २०१५ रोजीच्या एबीपी न्यूजने या घटनेबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की हा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला होता.
दिल्ली येथे रस्त्यावर नमाज पडणाऱ्या काही मुस्लिमांना लाथ मारत असताना एका पोलिसाचे व्हिडीओ फुटेज बाहेर आल्यानंतर पोलिसाला मारहाण असे सांगत हा व्हिडीओ शेयर केला जात होता. त्यावेळीही न्यूजचेकर इंग्रजीने या व्हिडीओचे फॅक्टचेक केले होते. ते येथे वाचता येईल.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ दिशाभूल करीत व्हायरल होत आहे.
Sources
YouTube Video by NDTV, Dated July 14, 2015
YouTube Video by ABP News, dated July 13, 2015
News published by Indian Express, dated July 14, 2015
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
June 5, 2025
Prasad S Prabhu
June 4, 2025
Komal Singh
June 4, 2025