Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडण्या-या भाजपा उमेदवाराचा व्हिडिओ उत्तरप्रदेश निवडणुकीदरम्यानचा असल्याचा दावा व्हायरल झाला आहे.
यूपीमध्ये ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झालेय यााबच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये फुलांचा हार घातलेला एक व्यक्ती गुडघे टेकून लोकांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर पायाला स्पर्श करणारी व्यक्ती भाजपची उमेदवार असल्याचे समजते.
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा केला जात आहे, जिथे भाजप उमेदवाराने निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अशाप्रकारे जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.

उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाची सांगता झाली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या एक्झिट पोल सर्वेक्षणात, यूपीमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करताना दिसत आहे. हे सर्वेक्षण कितपत अचूक आहे, हे 10 मार्चला निकाल लागल्यानंतर कळेल.
भारतात निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊन ज्येष्ठांच्या पायाला हात लावणे सामान्य आहे. पण व्हायरल व्हिडिओमध्ये ‘उमेदवार’ गुडघे टेकून लोकांच्या पायावर डोके टेकवताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याचा संबंध यूपी निवडणुकीशी जोडला जात आहे.
गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडण्या-या भाजपा उमेदवाराचा व्हिडिओ नेमका कुठला आहे? याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर व्हिडिओची फ्रेम रिव्हर्स सर्च केल्यावर, आम्हाला वन इंडियाचा रिपोर्ट आढळून आला. यात व्हायरल व्हिडिओ आहे आणि त्यात दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 बद्दल सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये वन इंडियाचा लोगोही दिसतो.

वृत्तानुसार, गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडण्या-या भाजपा उमेदवाराचे नाव संजय सिंह आहे, जे 2020 मध्ये झालेल्या दिल्ली निवडणुकीत विकासपुरी विधानसभेतून भाजपचा उमेदवार होते. 4 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणुकीच्या प्रचारासाठी संजय शिव विहार परिसरात पोहोचले होते. गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडलेले दिसलाे. त्यावेळी या अनोख्या निवडणूक प्रचाराबाबत आणखी काही बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
विकासपुरीतील चिखलाने भरलेल्या रस्त्यावर कमळाचे फूल लावून लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करताना संजय प्रचारादरम्यान पुन्हा एकदा चर्चेत आला होते. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडण्या-या भाजपा उमेदवाराचा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यानचा नाही तर दिल्लीतील 2020 च्या निवडणुकीदरम्यानचा आहे.
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
December 2, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025