Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हे छत्रपती शिवरायांचे खरे चित्र आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. संबंधित चित्र जोधपूरचे महाराज दुसरे जसवंतसिंग यांचे आहे.
छत्रपती शिवरायांचे खरे छायाचित्र असे सांगत एक छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. “आपल्या देशातील बॉलीवूड दिग्दर्शकही वास्तव दाखवत नाहीत. पण काळजी करू नका, माझे काम तुम्हाला सत्य दाखवणे आहे.” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल होत आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम शिवाजी महाराजांचे खरे छायाचित्र म्हणून शेयर केल्या जात असलेल्या चित्रावर Google रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला सर्वप्रथम Royal Collection Trust या वेबसाईटवर हे छायाचित्र सापडले.
फोटोच्या कॅप्शनमध्ये हे छायाचित्र जोधपूरचे महाराज दुसरे जसवंतसिंग यांचे असल्याचे आढळले. १८३८ ते १८९५ हा त्यांचा कालखंड आणि छायाचित्राबद्दलचे वर्णनही आम्हाला पाहायला मिळाले. संबंधित छायाचित्र व्हायरल चित्रासारखेच आहे.
यावरून सुगावा घेऊन आम्ही जोधपूरचे महाराज दुसरे जसवंतसिंग यांची छायाचित्रे शोधली. दरम्यान आम्हाला The Indian Portrait आणि Old Indian Photos या वेबसाइट्सवरही संबंधित चित्र आढळले असून वर्णनात ही छायाचित्रे जोधपूरचे महाराज दुसरे जसवंतसिंग यांचीच असल्याचे वाचायला मिळाले.
आम्ही शिवाजी महाराजांचे खरे चित्र याविषयावर शोध घेतला असता ज्येष्ठ इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी ते शोधून काढल्याची माहिती historianbendre.blogspot येथे १६ जुलै २०१४ रोजी लिहिलेली वाचायला मिळाली.
वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत जे संभाजी महाराज, तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या संशोधनासाठी आणि निष्कर्षांसाठी प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा शोधलेलीही व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. १६६४ मध्ये, सुरतचे डच गव्हर्नर वॉन व्हॅलेंटाइन यांनी शिवाजी महाराज आणि इतर राजपुत्रांची चित्रे तयार केली होती. युरोपमधील त्यांच्या संशोधनादरम्यान वासुदेव सीताराम बेंद्रे यांना ही चित्रे सापडली आणि त्यांनी ती १९३३ मध्ये प्रथमच प्रकाशित केली. वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्राला आजही अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे मूळ चित्र म्हणून संबोधले जाते.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल होत असलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे किंवा मूळ चित्र नसून ते जोधपूरचे महाराज दुसरे जसवंतसिंग यांचे असल्याचे स्पष्ट झाले असून व्हायरल दावा खोटा आहे.
Our Sources
Royal Collection Trust Website
The Indian Portrait Website
Old Indian Photos Website
Article published by historianbendre.blogspot on July 16, 2014
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025