Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
“धर्माच्या नावावर कोणी ख्रिश्चनांचा छळ किंवा हल्ला केल्यास दहा वर्षांची शिक्षा होणार. असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे,” असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ख्रिसमस सणाच्या काळात आणि त्यानंतर यासंदर्भात अनेक पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यापैकी हा मेसेज अनेक युजर्स फॉरवर्ड करू लागले आहेत.
ख्रिश्चनांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी युनायटेड ख्रिश्चन फॉर्म ही संघटना कार्यरत आहे. अन्याय झाल्यास मदतीसाठी संस्थेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. असे हा मेसेज सांगतो. या मेसेज चा संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे आहे. “सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, सुप्रीम कोर्टाने आणीबाणीचा निकाल दिला आहे….. धर्माच्या नावावर कोणी ख्रिश्चनांचा छळ किंवा हल्ला केल्यास दहा वर्षांची शिक्षा…भारत हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे… धर्माच्या नावावर कुणालाही शिक्षा नाही. ख्रिश्चनांना दडपण्याचा किंवा उपेक्षित करण्याचा अधिकार. कृपया आमच्या सर्व ख्रिश्चन बंधू आणि भगिनींना पाठवा…..देशातील ख्रिश्चनांसाठी “युनायटेड ख्रिश्चन फोरम” टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आज सुरू करण्यात आला आहे, कृपया तो जास्तीतजास्त ख्रिश्चन लोक आणि पाद्रींना द्या. क्रमांक आहे: 18002084545. हा आहे चर्च, प्रार्थना सभा किंवा अधिवेशनावर कोणताही हल्ला झाल्यास संपर्क करावयाचा क्रमांक. “युनायटेड ख्रिश्चन फोरम” शी जोडलेले ख्रिश्चन वकील आणि प्रभावशाली लोकांचा समूह तात्काळ मदतीसाठी पुढे येईल. मौल्यवान माहिती कृपया पुढे पाठवा. आमेन. प्रत्येक ख्रिश्चनाने हे जाणून घेतले पाहिजे आणि हा संदेश वाचवा देव महान आहे.”
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
या दाव्यासंदर्भात शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्हाला ख्रिश्चन समुदायावर वाढत चाललेल्या हल्ल्यांची माहिती मिळाली. देशात 2022 च्या पहिल्या सात महिन्यांत ख्रिश्चनांवर 300 हून अधिक हल्ले झाले आहेत. अशी माहिती आम्हाला एम के न्यूज ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत मिळाली. हाच संदर्भ घेऊन हा मेसेज सध्या व्हायरल होत असल्याचे दिसून आले. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कोणता आदेश दिला आहे का? हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र आम्हाला यासंदर्भात कोणतीच माहिती किंवा मीडिया रिपोर्ट्स प्राप्त झाले नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आम्ही शोध घेतला मात्र आम्हाला असा कोणताही आदेश किंवा निकालपत्र जाहीर करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले नाही. धार्मिक समुदायांवरील हल्ल्यांशी संबंधित गुन्हे आणि त्यासंदर्भातील आयपीसी कलमांनुसार किती शिक्षा आहे? याचा शोध आम्ही घेतला असता, ‘इंडियन कानून’ वेबसाइटवरील वर्णनानुसार धार्मिक समुदायांवरील हल्ल्यांशी संबंधित IPC कलमे अनुक्रमे 295, 295A आणि 153A आहेत. या कलमांतर्गत कमाल शिक्षा अनुक्रमे 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे कारावासाची आहे. अशी माहिती आम्हाला मिळाली.
युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राइट्सने राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्याबाबत पोस्टमधील दावा योग्य आहे. हेल्पलाइन क्रमांक 1-800-208-4545 आहे. UCFHR च्या 31 जानेवारी 2015 च्या पोस्टनुसार, हेल्पलाइनचे उद्दिष्ट ख्रिश्चनांवर लक्ष्य केलेल्या हिंसाचाराच्या बळींना कायदेशीर मदतीची हमी देणे आहे. पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की ही हेल्पलाइन अलीकडेच सुरू झाली नसून 2015 मध्ये सुरू झाली.
याबाबत अधिक स्पष्टीकरणासाठी युनायटेड ख्रिश्चन फोरमचे प्रवक्ते जॉन दयाल यांच्याशी न्यूजचेकरने संपर्क साधला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश जारी केलेला नाही. ख्रिश्चनांवर हल्ले केल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास होईल असा अपप्रचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ख्रिश्चनांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये लक्ष ठेऊन कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी हा फोरम काम करीत आहे.”
ख्रिश्चनांवर हल्ले केल्यास 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात सिद्ध झाले. पण हे खरे आहे की, युनायटेड ख्रिश्चन फोरमने ख्रिश्चनांवर हिंसाचार झाल्यास कायदेशीर सहाय्य करण्याच्या उद्देशाने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याची सुरुवात 2015 मध्ये झाली.
Our Sources
Information of IPC on Indiakanoon
Official Website of Supreme Court Of India
Telephone conversation with John Dayal, spokesperson for United Christian Forum
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
JP Tripathi
September 14, 2023
Prasad S Prabhu
January 19, 2023
Prasad S Prabhu
January 16, 2023