Wednesday, February 1, 2023
Wednesday, February 1, 2023

घरFact CheckViralपश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर तोडफोड करणाऱ्या तरुणांचा जुना व्हिडिओ व्हायरल

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर तोडफोड करणाऱ्या तरुणांचा जुना व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला की, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रेल्वेच्या आवाजाने नमाज वाचायला अडचण यायची. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या लोकांनी रेल्वे स्थानकात तोडफोड करण्यास सुरवात केली. सदर व्हिडिओत काही लोक हातात काठ्या घेऊन रेल्वे स्थानकाची तोडफोड करतांना दिसत आहे.

फेसबुकवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले,”मुर्शिदाबाद व बंगालमधील महिषासुर रेल्वे स्थानकावर शिट्ट्यांचा आवाज येत होता. त्यामुळे नमाज करण्यात अडचण येत होती. यामुळे ते उध्वस्त केले जात आहे. भारताचे भविष्य आपण पाहू शकता. रेल्वेच्या भोंग्याचा त्रास होतो म्हणून देशद्रोही जमातीने स्टेशन उध्वस्त केले.”

(वरील मूळ इंग्रजी पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

फेसबुकचा स्क्रिनशॉट – Jairam Undale

युजरने केलेल्या फेसबुक पोस्टचे काही स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

या व्यतिरिक्त ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

काही दिवसांपासून देशात रस्त्यावर नमाज वाचण्याचा मुद्दा खूपच जास्त गाजला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळी लाऊडस्पीकरचा जोरात येणारा आवाजाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

दैनिक दिव्य मराठीच्या एका बातमीनुसार, युपीत सध्या जवळपास १२ झोन आणि आयुक्तालयातल्या परिसरात धार्मिक स्थळावरील ६०३१ लाऊडस्पीकर हटवले गेले. २९६७४ धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकरचा आवाज मानकानुसार निश्चित करण्यात आला आहे.

याच दरम्यान सोशल मीडियावर रस्त्यावर अजान वाचण्यासंबंधितचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात दावा केला होता की, युपीत लाऊडस्पीकर बंदी घातल्यावर मुस्लिमांनी रस्त्यावर अजान देण्यास सुरवात केली. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला.

Fact Check/Verification

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रेल्वेच्या आवाजाने नमाज वाचायला अडचण यायची. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या लोकांनी रेल्वे स्थानकात तोडफोड करण्यास सुरवात केली, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘बंगाल मुर्शिदाबादचे स्थानक जाळले’ असं फेसबुकवर टाकून शोधले.

या दरम्यान चक्रवर्ती विक्रमादित्य नावाच्या फेसबुक युजरने १५ डिसेंबर २०१९ रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो आम्हांला मिळाला.

व्हिडिओसोबत लिहिलेल्या शीर्षकानुसार, पश्चिम बंगालमध्ये सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या काही तरुणांनी एका रेल्वे स्थानकाला आग लावली. फेसबुकवर युजरने जो व्हिडिओ अपलोड केलाय, त्यात व्हायरल झालेला व्हिडिओचा काही भाग आपण पाहू शकतो.

अजून पडताळणी केल्यावर फेसबुकवर बंगाली कीवर्डच्या मदतीने शोधले. तेव्हा आम्हाला एनटीव्हीडब्लूबी न्यूज नावाच्या एक युट्यूब वाहिनीने १४ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.

व्हिडिओचे शीर्षक बंगाली भाषेत लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद आहे,”पश्चिम बंगालच्या नौपाडातील महिषासुर स्थानकाला आग लावली लावली.” वाहिनीवर अपलोड केलेल्या व्हिडिओत आपण व्हायरल व्हिडिओ पाहू शकतो.

पश्चिम बंगालच्या रेल्वे स्थानकात आग लागल्याचे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर काही कीवर्ड टाकून शोधले. यात आम्हांला पश्चिम बंगालमधून प्रकाशित होणाऱ्या टाइम्स समूहाच्या ईसामे याची एक डिजिटल बातमी सापडली. ही बातमी १५ डिसेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाली होती.

त्या बातमीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सीएएच्या विरोधात कोलकाता व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात देखील आंदोलने झाली. त्याच दरम्यान मुर्शिदाबादसह अन्य काही ठिकाणी तोडफोड आणि हिंसेच्या घटना समोर आल्या. मुर्शिदाबादच्या रेल्वे स्थानकावर आग लागण्याची गोष्ट समोर आल्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना हिंसा आणि अफवा पसरवू नये, असे सांगितले होते.

या व्यतिरिक्त आम्हांला इंडियनरेल्वेइन्फो नावाच्या संकेतस्थळावर सीएए विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि अन्य काही ठिकाणी तोडफोड संबंधितचे काही फोटो मिळाले. संकेतस्थळानुसार १३ डिसेंबर २०१९ रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद रेल्वे स्थानकात तोडफोड झाल्याने रेल्वेची ये-जा थांबवण्यात आली. 

इंडियनरेल्वेइन्फोचा स्क्रिनशॉट

न्यूजचेकरने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मालदातील डीआरएम ऑफिसमध्ये संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले,”सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून तो पश्चिम बंगालमधील सीएए आंदोलनातील आहे. आता तो भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात आहे.”

हे देखील वाचू शकता : औरंगाबादमध्ये खरंच कलम १४४ लागू करण्यात आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीते हे स्पष्ट झाले की, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रेल्वेच्या आवाजाने नमाज वाचायला अडचण यायची. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या लोकांनी रेल्वे स्थानकात तोडफोड करण्यास सुरवात केली, हा शेअर केला जाणारा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. आंदोलकांनी सीएए आणि एनआरसीच्या आंदोलनाविरुद्ध स्थानकावर आग लावली होती. 

Result : False Context/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular