Authors
(याची तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली असून हा लेख Shubham Singh याने लिहिला आहे)
सोशल मीडियावर हॉकी खेळाडू बलबीर सिंह सिनिअर यांचा एक फोटो शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. बलबीर यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमे आणि नेत्यांनी दुर्लक्षित केली आहे, असे म्हटले जात आहे. व्हायरल फोटोत बलबीर सिंह यांचे पार्थिव शरीर दिसत आहे.
फेसबुकवर अनेक युजरने हा फोटो शेअर करत दावा केलाय की, बलबीर सिंह सिनिअर यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ट्विटरवर देखील अनेक युजरने हा फोटो शेअर करत तो आताचा असल्याचे म्हटले आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.
बलबीर सिंह सिनिअर यांचा जन्म ३१ डिसेंबर १९२३ मध्ये पंजाबमधील जालंदर जिल्ह्यात झाला होता. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी हॉकी खेळण्याचे ठरवले होते. भारतीय हॉकीमध्ये त्यांना सर्वोत्तम सेंटर फॉरवर्ड खेळाडू मानले जात असे. त्यांनी आपला उत्तम खेळ दाखवत भारताला १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये अशा सलग तीन ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. बलबीर सिंह सिनिअर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार, बलबीर सिंह सिनिअर आणि भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंह इतके लोकप्रिय होते की, भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती.
Fact Check/Verification
व्हायरल फोटो गुगल रिव्हर्सच्या सहाय्याने शोधल्यावर आम्हांला पत्रकार अर्शदीप कौर, भारतीय बॉक्सर नीरज गोयत आणि कंवल सिंह नावाच्या युजरचे ट्विट मिळाले. हे सर्व ट्विट २५-२६ मे २०२० दरम्यान केले होते. त्यात बलबीर सिंह सिनिअर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये व्हायरल फोटो देखील जोडला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा फोटो २०२० पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि बलबीर सिंह सिनिअर यांचे निधन आता नाही तर दोन वर्षांपूर्वीच झाले आहे.
(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता)
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.
बलबीर सिंह सिनिअर यांच्या निधनाची बातमी बीबीसी हिंदी, इंडियन एक्सप्रेस आणि इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. प्रसार माध्यमानुसार, बलबीर सिंह सिनिअर यांचे निधन वयाच्या ९५ व्या वर्षी २५ मे २०२० रोजी झाले होते. त्यांनी तब्येत खराब झाल्याने त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते.
बलबीर सिंह सिनिअर यांच्या निधनाची बातमी बीबीसी हिंदी, इंडियन एक्सप्रेस आणि इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. प्रसार माध्यमानुसार, बलबीर सिंह सिनिअर यांचे निधन वयाच्या ९५ व्या वर्षी २५ मे २०२० रोजी झाले होते. त्यांनी तब्येत खराब झाल्याने त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते.
या व्यतिरिक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तत्कालीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बलबीर सिंह सिनिअर यांच्या निधनाबद्दलचे ट्विट करून दुःख व्यक्त केले होते.
हे देखील वाचू शकता : बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना खरंच टिळक लावून आशिर्वाद देत आहे? त्या फोटोचे सत्य जाणून घ्या
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, बलबीर सिंह सिनिअर यांची दोन वर्षांपूर्वीची जुनी बातमी आताची सांगून शेअर केली जात आहे.
Result : Partly False
Our Sources
२५ मे २०२० रोजी अर्शदीप कौर, नीरज गोयत आणि कंवल सिंह यांनी केलेले ट्विट
२५ मे २०२० रोजी बीबीसी हिंदी, इंडियन एक्सप्रेस आणि इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेली बातमी
२५ मे २०२० रोजी पंतप्रधान मोदी, अमित शहा, किरेन रिजिजू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलेले ट्विट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.