Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. तो व्हिडिओ मुंबईतील रामनवमीचा सांगितला जात होता.
व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एका फ्रेमला यांडेक्सवर टाकून सर्च केले. यात आम्हांला प्रतीक देवी नावाच्या एका यु ट्यूब वाहिनीने १९ जुलै २०२० अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.
सदर व्हिडिओ चिंचपोकळी चिंतामणी विसर्जनाचा आहे, असे सांगितले अजित आहे. आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ मुंबईतील प्रसिद्ध गणेश चतुर्थीच्या मंडळातील आहे.
२ एप्रिल २०२० रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणी या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून अपलोड केलेली एक पोस्ट मिळाली. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली होती.
व्हायरल व्हिडिओविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी न्यूजचेकरने चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाशी संपर्क साधला.
संस्थेचे महासचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले,”इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडिओ मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील आहे. हा व्हिडिओ २०१९ च्या चिंचपोकळीच्या गणपती विसर्जनातील आहे.”
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ २०१९ मध्ये आयोजित केलेल्या गणपती विसर्जनाचा आहे.
इथे वाचू शकता : सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते ? चुकीची माहिती व्हायरल
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
January 31, 2025
Prasad S Prabhu
December 30, 2024
Prasad S Prabhu
November 19, 2024