Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
शनिवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि दंड ठोठावला अशी बातमी आली. शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे,ज्यामध्ये तो हात पसरून उभा असून सुरक्षा कर्मचारी त्याची तपासणी करताना दिसत आहेत. शाहरुखला सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर थांबवले तेव्हाचा अर्थात शनिवारचा हा फोटो आहे,अशा पद्धतीने हे चित्र मांडले जात आहे.
मुंबई पोलीस शाहरुखसोबत असे वागू शकतात,याची कल्पनाही कोणी केली नसेल,असे लोक लिहित आहेत. तसेच,वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की हे चित्र भारतातील बदलाची कहाणी सांगते. या दाव्यांसह हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोवर एका व्यक्तीने ट्विट केले की,हा फोटो 2019 चा आहे जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅचनंतर शाहरुख कोलकाता विमानतळावर पोहोचला होता. या ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील आहे,ज्यामध्ये शाहरुख खान विमानतळावर सुरक्षा तपासणी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुखने तेच कपडे परिधान केले आहेत जे तो व्हायरल झालेल्या फोटोत आहेत.
शिवाय,व्हिडिओची एक फ्रेम व्हायरल चित्राशी पूर्णपणे जुळते.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की व्हायरल झालेला फोटो आणि हा व्हिडिओ एकाच ठिकाणचा आणि वेळेचा आहे.
काही कीवर्डच्या मदतीने सर्च केल्यावर आम्हाला शाहरुख खानचा हा व्हिडिओ यूट्यूबवर सापडला. येथील व्हिडिओ 28 मार्च 2019 रोजी शेअर करण्यात आला होता.
आम्हाला ट्विटरवर या व्हिडिओसारखाच दुसरा व्हिडिओ देखील सापडला आहे. हा व्हिडिओ 28 मार्च 2019 रोजी शाहरुख खान फॅन क्लबच्या सत्यापित ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.
27 मार्च 2019 रोजी झालेल्या या सामन्याबाबत त्यावेळी अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या,ज्यामध्ये शाहरुख खानचे फोटो पाहता येतात. फोटोंमध्ये शाहरुखने व्हायरल झालेल्या फोटो मधीलच कपडे घातलेले दिसत आहेत.
येथे ही गोष्ट स्पष्ट होते की व्हायरल झालेले चित्र या सामन्यानंतरचे आहे आणि ते कोलकाता विमानतळावरील आहे. व्हिडीओ पाहून हे देखील स्पष्ट होते की शाहरुख विमानतळावर सामान्य सुरक्षा तपासणी करून घेत आहे,जी प्रवाशांसाठी अनिवार्य आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार कस्टम अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की,मुंबई विमानतळावर थांबविण्यात आलेला शाहरुख नसून त्याचा अंगरक्षक होता. तसेच शाहरुख आणि त्याच्या टीमकडून केवळ परदेशातून आणलेल्या मालावर कस्टम ड्युटी घेण्यात आली होती. शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंगने नियम मोडल्यामुळे त्याला थांबवण्यात आले. मात्र त्यांनाही कस्टम ड्युटी भरून सोडून देण्यात आले.रवीने परदेशातून काही आलिशान घड्याळे सोबत आणली होती.
शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी आधीच विमानतळावरून निघून गेले होते आणि दोघांचीही चौकशी करण्यात आली नाही,असे या बातमीत म्हटले आहे. सीमाशुल्क विभागाने प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियानेही आपल्या बातमीत ही माहिती दिली आहे.
एकंदरीत व्हायरल झालेल्या पोस्टवरून दिशाभूल करणारा दावा केला जात असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. शाहरुख खानचा व्हायरल झालेला हा फोटो मुंबईचा नसून कोलकाता विमानतळावरील आहे आणि 2019 मधील आहे. शनिवारी आलेल्या कस्टमच्या बातम्यांशी त्याचा काहीही संबंध नाही.
Our Sources
Tweet of a user Ejaz Ahmed, posted on November 13, 2022
YouTube Video posted on March 28, 2019
Tweet of SRK Fan Club, posted on March 28, 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा:9999499044 किंवा ई-मेल:checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
January 11, 2025
Sabloo Thomas
January 8, 2025
Newschecker Team
January 4, 2022