Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह यांनी लिहिला आहे.
सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल नेतृत्व करणाऱ्या दिल्ली सरकारला लक्ष्य करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती अडखळत बस स्थानकाजवळील ड्रेनेजमध्ये पडला. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्याला वाचवण्यासाठी खूप धडपड करावी लागली. हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सरकारकडून स्वस्तात मिळणारी दारू, यामुळे अशी वाक्ये बघायला मिळत आहे.
दिल्ली सरकारने गेल्या वर्षी नवीन एक्साईज धोरण आणले होते. यामध्ये संपूर्ण दिल्लीची ३२ झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून मद्यपान करणाऱ्यांचे वय २५ वर्षांपासून २१ वर्षे करण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या या योजनेला भाजपने कडाडून विरोध केला. आजतकच्या बातमीनुसार, दिल्लीत जुन्या धोरणानुसार मद्य उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री मनिष सिसोदिया म्हणाले की, नवीन धोरण येईपर्यंत जुनी यंत्रणा येत्या सहा महिने चालेल.
दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या अनुजा कपूरसह अनेक ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आणि तो दिल्लीचा असल्याचे सांगितले आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
काही फेसबुक युजरने देखील हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याचे सांगितले आहे.

Fact Check / Verification
या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला. या व्हिडिओत ३८ व्या सेकंदावर एक फलक दिसला, त्यावर ‘गोल्ड लोन’ च्या खाली काही फोन नंबर लिहिले होते. न्यूजचेकरच्या तमिळ टीमने तेथील एका नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर आमची एका दुकानाच्या मालकाशी बोलणे झाले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ही घटना तामिळनाडूच्या होसुर बस स्थानकवरील आहे, जी एक आठवड्यापूर्वी घडली होती.

त्यानंतर आम्ही ट्विटरवर काही कीवर्ड टाकले. तेव्हा आम्हांला न्यू इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार बॉस्की खन्ना यांनी ४ ऑगस्ट २०२२ रोजी केलेले एक ट्विट मिळाले. या ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील जोडला होता, जो व्हायरल व्हिडिओशी खूपच मिळता-जुळता आहे. या ट्विटच्या शिर्षकात लिहिलंय की, हा व्हिडिओ होसुर बस स्थानकाचा आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
या व्यतिरिक्त आम्हांला न्यूज १८ तमिळ आणि न्यूज १८ च्या ट्विटर खात्यावरील ४ ऑगस्ट २०२२ रोजीचे एक ट्विट मिळाले. ज्यात हा व्हिडिओ तामिळनाडूतील होसुर बस स्थानकाचा असल्याचे सांगितले आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
त्याचबरोबर आम्हांला ४ ऑगस्ट २०२२ रोजीचा एनबीटी तामिळची एक बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुर आणि त्याच्या जवळच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तेथील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. त्यातच मुख्य रस्त्यावर खूपच गर्दी झाली. त्यात एक मद्यधुंद व्यक्ती रस्ता ओलांडताना अचानक घसरला आणि एका नाल्यात जाऊन पडला. तिथे आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला नाल्यातून बाहेर काढले आणि त्याला होसुरच्या जिल्हा रुग्णालयात नेले.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर तामिळनाडूतील होसुरमधील झालेल्या घटनेचा व्हिडिओ दिल्लीचा सांगत दिशाभूल केली जात आहे.
Result : False
Our Sources
फोनवरून ८ ऑगस्ट २०२२ रोजी होसुरच्या गोल्ड लोन या दुकान मालकाशी झालेला संवाद
४ ऑगस्ट २०२२ रोजी बॉस्की खन्ना यांचे ट्विट
४ ऑगस्ट २०२२ रोजी न्यूज १८ तमिळ आणि न्यूज १८ चे ट्विट
४ ऑगस्ट २०२२ रोजीची एनबीटी तमिळची प्रकाशित झालेली बातमी
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.