Authors
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला बेदम मारले. त्या व्हायरल व्हिडिओत पोलिसांच्या वर्दीत काही व्यक्ती त्याला बेदम मारतांना दिसत आहे.
एका फेसबुक पानावर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिलंय,”व्हिडिओ #रामराज्य उत्तर प्रदेशातील सांगितली जात आहे. हे पोलीस संविधानाच्या अधीन आहे. RSS, VHP ने केलेले अत्याचार कोणावरही होऊ दे. मुसलमान, दलित, आदिवासी ते सहन करणार नाही.”
(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
फेसबुकवर एका दुसऱ्या युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय,”व्हिडिओ #रामराज्यातील सांगितला जात आहे. बरं याला कोणती डिग्री म्हणणे योग्य ठरेल ?”
(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
एका अन्य फेसबुक युजरने व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिलंय,”व्हिडिओ #रामराज्यातील सांगितला जात आहे. बरं याला कोणती डिग्रीचा म्हणणे योग्य ठरेल ?”
(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
काही दिवसांपूर्वी युपीत जौनपुर जिल्ह्यातील दलित वस्तीतील काही महिलांनी आरोप केलाय की, पोलिसांनी त्यांना निर्वस्त्र करून मारले. या घटनेबाबत युपीतील विरोधी पक्ष समाजवादी पार्टी आणि भीम आर्मीने योगी सरकारच्या पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात महिला कपडे उचलून शरीरावरील जखमेचे निशाण दाखवत आहे. जौनपुर पोलिसांनी अधिकृत विधान जारी केले. या घटनेत दोन्ही बाजूने एकमेकांना मारहाण झाली.
तसेच या संबंधित गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्हायरल व्हिडिओत दिसणारी महिला त्या खटल्यातील आरोपी आहे. पोलीस ठाण्यात महिलेसोबत केलेल्या वर्तनाचा आरोप निराधार आहे.
यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात असा दावा केलाय की, युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला बेदम मारले.
Fact Check / Verification
या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही इन-विड टूलची मदत घेतली. व्हायरल व्हिडिओतील की-फ्रेम्स टाकून त्या गुगलवर शोधल्या. यातच आम्हांला न्यूजनेशनने १० जानेवारी २०२० रोजी प्रकाशित केलेली एक बातमी सापडली. त्या बातमीनुसार युपीतील देवरिया जिल्ह्यात मोबाईलची चोरी झाली. त्यात पकडलेल्या तरुणाला पोलिसांनी ठाण्यात मारले.
देवरियातील मदनपूर पोलीस ठाण्यात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस अधीक्षक श्रीपती मिश्र यांनी तीन पोलिसांना निलंबित केले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. न्यूजनेशनने प्रकाशित केलेल्या बातमीत व्हायरल व्हिडिओचे छायाचित्रे दिसत आहे.
या तपासात आम्ही काही कीवर्ड टाकून ट्विटरवर शोधले. त्यातच आम्हांला झी न्यूज युपी / उत्तराखंडने ९ जानेवारी २०२० केलेले एक ट्विट सापडले. त्या ट्विटनुसार,”युपीत मोबाईल चोरी झालेल्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.”
या ट्विटला देवरिया पोलिसांनी प्रतिक्रिया दिली. देवरिया पोलिसांनुसार, पोलिसांना मोबाईल चोरीची सूचना मिळाल्यावर सुमित गोस्वामी नावाच्या एका तरुणाला ठाण्यात पकडून आणले.
या चौकशी दरम्यान हेड कॉन्स्टेबल चंद्रमौलेश्वर सिंह, लाल बिहारी आणि जितेंद्र यादव यांनी बेदम मारले. त्यांच्यासोबत त्याने शिवीगाळ केली. ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याचा तपास क्षेत्राधिकारी रुद्रपुर यांना सोपवली. तपास केल्यावर त्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले.
या व्यतिरिक्त काही अन्य मीडिया संस्थेनी देवरिया पोलीस ठाण्यात तरुणाला मारण्याच्या व्हिडिओ संबंधित बातम्या प्रकाशित केल्या होत्या.
दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर या व्हिडिओचा एक स्क्रिनशॉट व्हायरल करून दावा केला जात होता की, पोलिसांनी ठाण्यात पत्रकार अर्णब गोस्वामीला मारले. न्यूजचेकरने व्हायरल दाव्याचा शोध घेतला. त्यात व्हायरल फोटोचा दावा भ्रामक ठरला. ज्याचा फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात स्पष्ट झाले की, पोलीस ठाण्यात तरुणाला बेदम मारण्याचा दावा केला जात होता. तो शेअर केला जाणारा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.
Result : Misleading / Partly False
Our Sources
न्यूजनेशने १० जानेवारी २०२० रोजी प्रकाशित केलेली बातमी
९ जानेवारी २०२० रोजी देवरिया पोलिसांनी ट्विटला दिलेली प्रतिक्रिया
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.