Sunday, September 29, 2024
Sunday, September 29, 2024

HomeFact CheckFact Check: स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा नेहरूंचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड...

Fact Check: स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा नेहरूंचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड आहे

Authors

Vasudha noticed the growing problem of mis/disinformation online after studying New Media at ACJ in Chennai and became interested in separating facts from fiction. She is interested in learning how global issues affect individuals on a micro level. Before joining Newschecker’s English team, she was working with Latestly.

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
जवाहरलाल नेहरूंनी एका मुलाखतीत कबूल केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सहभाग नव्हता.
Fact

व्हिडिओमध्ये डिजिटली फेरफार केल्याचे आढळले. अस्सल फुटेजमध्ये, नेहरू म्हणतात की मिस्टर जिना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते.

अधिकृत हँडल्ससह अनेक सोशल मीडिया युजर्सनी जवाहरलाल नेहरूंच्या मुलाखतीचे एक ब्लॅक अँड व्हाईट फुटेज शेअर करीत दावा करत आहेत की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील नव्हते हे नेहरू स्वतः कबूल करतात. जुन्या व्हिडिओमध्ये नेहरू मुस्लीम लीग आणि फाळणीबद्दल बोलतानाही ऐकायला मिळते. तथापि, न्यूजचेकरला असे आढळून आले की व्हिडिओ अस्सल नाही आणि तो डिजिटल पद्धतीने हाताळला गेला आहे.

एकाहून अधिक एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सनी दावा करत 49-सेकंद-लांबीचा व्हिडिओ शेअर केला आहे, “I was not involved in the fight for independence at all. In fact, opposed it” असे नेहरूंनी स्वतः विदेशी पत्रकारासमोर कबूल केले असल्याचे दाव्यात म्हटले आहे.

अशा पोस्ट इथे, इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील.

Fact Check/ Verification

व्हायरल फुटेजचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, आम्ही नेहरूंना “…खरं तर त्यांनी विरोध केला,” असे म्हणताना ऐकले, मोठ्या प्रमाणावर दावा केला जात असल्याप्रमाणे “मी विरोध केला,” असे नाही. पुढे, व्हिडिओच्या या विभागातील उपशीर्षके चुकीच्या पद्धतीने “तुम्ही विरोध केला” असे लिहिण्यात आली असल्याचेही आम्हाला जाणवले.

Fact Check: नेहरूंचा स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड आहे
Screengrab from viral video

मुस्लीम लीग आणि फाळणीबद्दल बोलतानाही आम्ही ऐकले. एक सुगावा घेऊन, आम्ही यूट्यूबवर “नेहरू,” “मुलाखत,” “फाळणी” आणि “मुस्लिम लीग” हे कीवर्ड शोधले, ज्यामुळे आम्हाला प्रसार भारती आर्काइव्हजचा 27 मे 2024 रोजीचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला. त्याचे वर्णन, “प्रसार भारती अर्काइव्हजने स्वातंत्र्य आणि फाळणीच्या परिस्थितीबद्दल बोलताना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची शेवटची मुलाखत सादर केली आहे.” असे आहे.

“तुम्ही आणि श्रीमान गांधी याच्या बाजूने होते का?” मुलाखतकाराने नेहरूंना विचारले. “मिस्टर गांधी शेवटपर्यंत याच्या बाजूने नव्हते. परिस्थिती आली तेव्हाही ते त्याला अनुकूल नव्हते. मीही याच्या बाजूने नव्हतो. पण शेवटी, मी इतरांप्रमाणे ठरवले, इतर अनेकांप्रमाणे, की या स्थिर … त्रासापेक्षा विभाजन करणे चांगले आहे,” असा प्रतिसाद ते देतात.

प्रसार भारती संग्रहित व्हिडिओ आणि व्हायरल फुटेज यांच्यातील तुलना खाली पाहता येईल.

Fact Check: नेहरूंचा स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड आहे
(L-R) Screengrab from viral video and screengrab from YouTube video by Prasar Bharati Archives

आम्हाला आढळले की संपूर्ण मुलाखत त्याच YouTube चॅनेलवर मे 2019 मध्ये शेयर केली गेली आहे. त्याचे वर्णन सांगते की, “Full video recording of what was perhaps Pandit Jawaharlal Nehru’s last significant interview to American TV Host Arnold Mich Jawaharlal Nehru’s last TV Interview – May 1964…Another book by Chandrika Prasad provides a date of 18th May 1964  when the interview was aired in New York, this is barely a few days before the death of Pandit Nehru on 27th May 1964.”

Fact Check: नेहरूंचा स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नसल्याचे ‘कबुल’ करतानाचा व्हायरल व्हिडीओ मॅनिप्युलेटेड आहे
Screengrab from YouTube video by Prasar Bharati Archives

व्हिडिओमध्ये सुमारे 14:34 मिनिटांच्या सुमारास, आम्ही मुलाखतकाराला असे विचारताना ऐकले, “आता… तुम्ही, आणि श्रीमान गांधी आणि श्री जिना, तुम्ही सर्वजण त्या वेळी… ब्रिटीशांच्या वर्चस्वातून भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि नंतर फाळणीच्या लढाईत सहभागी होता. त्यानंतर नेहरूंनी प्रतिवाद केला की जिना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते. त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे मुस्लीम लीग आणि फाळणीबद्दल ते बोलतात.

नेहरू म्हणाले की, “मी स्वातंत्र्याच्या लढ्यात अजिबात सामील नव्हतो.” असा खोटा दावा करण्यासाठी “मिस्टर जिना” हा शब्द डिजिटली “मी” ने बदलण्यात आला आहे, असे स्पष्ट झाले.

Conclusion

अशा प्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नव्हते हे त्यांनी स्वतः कबूल केले होते असे सांगण्यासाठी केलेला दावा आणि त्यातील व्हायरल फुटेज डिजिटली एडिट केले गेले आहे.

Result: Altered Video

Sources
YouTube Video By Prasar Bharati Archives, Dated May 27, 2024
YouTube Video By Prasar Bharati Archives, Dated May 14, 2019


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Vasudha noticed the growing problem of mis/disinformation online after studying New Media at ACJ in Chennai and became interested in separating facts from fiction. She is interested in learning how global issues affect individuals on a micro level. Before joining Newschecker’s English team, she was working with Latestly.

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular