Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
“मुस्लिम मालकीचे” हरियाणाचे भोजनालय बिर्याणी शिजवण्यासाठी गटाराचे पाणी वापरते.
Fact
व्हायरल दावे खोटे आहेत, भोजनालय गटारीतील पाण्याचा रस्त्यावर उपसा करीत होते.
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये पिंजोर, हरियाणातील एका बिर्याणीच्या दुकानात भांडण सुरु आहे, असा दावा केला आहे की बिर्याणी शिजवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी वापरणाऱ्या भोजनालयातील कामगारांना स्थानिकांनी पकडले. कथितरित्या पाणी जिथून उचलले जात आहे ते गटार देखील दर्शविणारा व्हिडिओ जातीय कथनसह व्हायरल झाला आहे आणि दावा केला आहे की ही देशभरातील अशा भोजनालयांच्या मुस्लिम मालकांची ही मोडस ऑपरेंडी आहे. काही प्रसारमाध्यमांनी देखील त्याच वर्णनासह व्हायरल व्हिडिओवर बातम्या प्रसिद्ध केल्या, दुकानमालकाने स्थानिकांना ₹ 5000 लाच देण्याचा प्रयत्न केला, तरीही संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. असा मजकूर आढळला.
ट्विट्स आणि रिपोर्ट्सच्या संग्रहित आवृत्त्या येथे, येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.
न्यूजचेकरच्या लक्षात आले की गटारमधील हिरवी पाईप, जिथून कथितपणे बिर्याणी जॉईंटने पाणी काढले होते, ती भोजनालयाच्या स्वयंपाक किंवा साफसफाईच्या ठिकाणी जात नाही, तर जवळच्या रस्त्याकडे जाते, ज्यामुळे शंका निर्माण झाली.
आम्ही जस्टडायलवर, शमा बिर्याणी ढाबा, भोजनालय पाहिले, तेथून आम्ही या स्टोअरमधील कर्मचारी यासीन रिझवी याच्याशी संपर्क साधला, त्यानी व्हायरल केलेले दावे खोटे असल्याचे सांगितले. रिझवी म्हणाले, “आम्ही फक्त गटारातील घाण पाणी बाहेर काढत होतो.”
त्यानंतर न्यूजचेकरने पिंजोर पोलिस स्टेशनचे एसएचओ, निरीक्षक करमवीर यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी व्हायरल दावे खोटे असल्याची पुष्टी केली, त्यांनी पुनरुच्चार केला की बिर्याणी शिजवण्यासाठी किंवा खाण्यापिण्याच्या कोणत्याही साफसफाईच्या उद्देशाने गटरचे पाणी वापरले जात नाही. “तक्रारकर्त्यांनी सांगितले की, भोजनालय जवळपासचा परिसर प्रदूषित करत आहे. आम्ही दोन्ही बाजूंना बोलावून भोजनालय मालकांना घाणेरडे पाणी रस्त्यावर न टाकता टाकीत टाकण्याचा सल्ला दिला. गटाराचे पाणी ओव्हरफ्लो झाले की [भोजनालय मालक] सहसा जवळच्या रस्त्यावर उपसा करतात.”
आम्ही भोजनालयाच्या मालकाशी देखील संपर्क साधला आहे, त्यांचा फोन हे आर्टिकल प्रसिद्ध करण्याच्या वेळेपर्यंत बंद होता. आम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर आम्ही हे आर्टिकल अपडेट करू.
रस्त्याच्या कडेला असलेले बिर्याणीचे दुकान स्वयंपाक आणि साफसफाईसाठी गटाराचे पाणी वापरत असल्याच्या खोट्या जातीय दाव्यासह हरियाणा भोजनालयातील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Sources
Conversation with inspector Karamveer, Pinjore police station
Conversation with Yaseen Rizvi, Shama Biryani Dhaba
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल एच. एम. यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
May 21, 2025
Komal Singh
January 16, 2025
Prasad S Prabhu
October 30, 2024