Authors
मागील आठवडाही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांनी गाजला. केरळमध्ये बुरखा न घालणाऱ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. असा दावा करण्यात आला. उद्योगपती रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला झालेला दंड भरण्याची घोषणा केली. असा दावा करण्यात आला. कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा करण्यात आला. मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
केरळमध्ये बुरखा नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये चढण्यापासून रोखले?
केरळमध्ये बुरखा न घालणाऱ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
राशिद खानला रतन टाटा 10 कोटी देणार का?
उद्योगपती रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला झालेला दंड भरण्याची घोषणा केली. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली नाही
कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून झाली मारहाण?
मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा