Authors
नुपूर शर्मा यांना फटकारणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी.पारदीवाला हे काँग्रेसचे आमदार होते. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी अनेक वृत्त माध्यमांनी दिली. पण हे दोन्ही देखील दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.
नुपूर शर्मा यांना फटकारणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी.पारदीवाला हे खरंच काँगेसचे आमदार होते? याचे सत्य जाणून घ्या
नुपूर शर्मा यांना फटकारणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी.पारदीवाला हे काँगेसचे आमदार होते, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
दुचाकी घसरण्याचा व्हायरल व्हिडिओ खरंच पुण्यातील हडपसरचा आहे? याचे सत्य जाणून घ्या
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तो हडपसरमधील असल्याचा दावा केला जात होता. पण हा दावा आमच्या पडताळणीत चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी खरी आहे? याचे सत्य जाणून घ्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाल्याची बातमी अनेक वृत्त माध्यमांनी दिली. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
शेअर केले जाणारे फोटो खरंच मणिपूरच्या नोनी येथील सध्याच्या भूस्खलनाचे आहे? याचे सत्य जाणून घ्या
सोशल मीडियावर दोन फोटो एकत्र करत ते नुकत्याच झालेल्या मणिपूरच्या नोनी येथील भूस्खलनाचे आहे, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
‘ॲफेलियन फेनोमेनन’मुळे ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहिल? याचे सत्य जाणून घ्या
ॲफेलियन फेनोमेननमुळे ऑगस्टपर्यंत हवामान अधिक थंड राहिल, असा दावा केला जात होता. हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.