Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check

सोशल मीडियात फुलाचा एक फोटो व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की, हा फोटो 50 वर्षातून एकदाच उमलणा-या ॐ कार पुष्प या फुलाचा आहे. ही निसर्गाची अगाध लीला आहे, त्यामुळे हा फोटो केवळ आपल्यापुरता न ठेवता इतरांनाही पाठवा. पण हे सत्य नाही. हे फूल हिमालयात उगवणारे नाही तर परदेशातील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर आलेल्या दोन वाघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात आला आहे की, हे वाघ 19 आॅगस्ट 2021 रोजीच्या रात्री महाबळेश्वर- पाचगणी रोडवर पर्यचकांच्या गाडी समोर आले होते, त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे, पण हे सत्य नाही व्हायरल व्हिडिओ जुना आहे. तो महाबळेश्वरचा तर चंद्रपुरजवळील ताडोबा अभयारण्यातील असल्याचे सत्य समोर आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या. भारतातील अनेक दिग्गजांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी “तालिबान हा लोकशाहीवर चालणारा समूह आहे” असे म्हटल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

सोशल मीडियात सध्या काॅंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील बॅनरमुळे सोशल मीडियावर युजर्स उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. या बैठकीत सोनिया गांधी मनमोहन सिंह, राहुल गांधींसह अतर अनेक नेत दिसत आहेत मात्र त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत आहे. पण हे सत्य नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मुंबईत बेस्ट ने इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु केलेली असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक लाल रंगाची कार असून कारच्या बाजुला खाकी गणवेश परिधान केलेला व्यक्ती ही उभा आहे. तसेच कार वर बेस्टचा लोगो लावलेला असून ड्रायव्हरच्या दरवाजावर BEST ELECTRICK TAXI असे लिहिले आहे. पण हे स्तय नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Prasad S Prabhu
December 13, 2025
Prasad S Prabhu
December 6, 2025
Prasad S Prabhu
November 29, 2025