Friday, December 27, 2024
Friday, December 27, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल किट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली

Weekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल किट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. टाटा हेल्थ कंपनीने कोविडसाठी घरगुती मेडिकल किट सुचविले असल्याचा दावा व्हायरल झाला तर काॅंग्रेसचे दिवंगत नेते विलास राव देशमुख यांचा लहानपणीचा फोटो डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्हायरल झाला. शिवाय कोरोना रुग्णांना गळा दाबून जीवे मारले जात असल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात शेअर होत आहे. तसेच सध्या आॅक्सिजन पातळी वाढण्यासासाठी लवंग, कापूरची पोटलीचा वास घ्यावा या उपाय सुचविणारी पोस्ट देखील व्हायरल होत आहे.

याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचे टप्पे, कोणती औषधे घरात बाळगावीत तसेच कोरोना होऊ नये म्हणून नेमके काय करावे आहार काय घ्यावा इत्यादी माहिती यात देण्यात आली आहे.

टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा दावा

टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचे टप्पे, कोणती औषधे घरात बाळगावीत तसेच कोरोना होऊ नये म्हणून नेमके काय करावे आहार काय घ्यावा इत्यादी माहिती यात देण्यात आली आहे. पण हे सत्य नाही. पोस्टमधील माहिती चुकी आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

सोशल मीडियात एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा असल्याचा दावा केला जात आहे. ब्लॅक अॅंड व्हाईट फोटोत एक लहान मुलगा दिसत आहेत ते लहानपणीचे डाॅ. आंबेडकर असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. पण हे सत्य नाही हा फोटो काॅंग्रेसच्या दिवंगत नेत्याच्या लहानपणीचा आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

डाॅक्टरने कोरोना रुग्णाला गळा दाबून मारले नाही, व्हायरल व्हिडिओचे हे आहे सत्य

डाॅक्टर कोरोना रुग्णाला गळा दाबून मारत असल्याचा दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती खाटेवर झोपून आहे तर दुसरा मास्क लावलेला व्यक्ती त्याच्याशी झटापट करताना दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या नावाखाली लोकांना मारत आहेत. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ कोरोना रुग्ण आणि डाॅक्टरचा नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते का? हे आहे सत्य

कापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुुरु असून यात आॅक्सिजन पातळी अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आॅक्सिजन पातळी वाढविण्यासाठी या आयुर्वेदिक पोटलीचा उपयोग करावा असा सल्ला या पोस्टमधून देण्यात आला आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular