Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
कापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुुरु असून यात आॅक्सिजन पातळी अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आॅक्सिजन पातळी वाढविण्यासाठी या आयुर्वेदिक पोटलीचा उपयोग करावा असा सल्ला या पोस्टमधून देण्यात आला आहे.
काय म्हटले आहे या पोस्टमध्ये?
“कापूर, लवंग, ओवा आणि काही थेंब निलगिरीचे तेल. दिवसभर रात्रभर पोटली बनवून वास घ्या. ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत करते. ऑक्सिजन पातळी कमी असते तेव्हा लडाखमधील पर्यटकांनाही ही पोटली दिली जाते. हा एक घरगुती उपचार आहे.“
फेसबुकवर देखील हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शेकडो यूजर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे.
crowdtangle वर या दाव्या संदर्भात 46,572 इन्ट्रेक्शन्स झाले आहेत तर 160 पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. KhaasRe.Com च्या फेसबुक पेजवरील पोस्टला सर्वात जास्त 2800 लाईक्स आहेत तर 1100 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
कापूर, लवंग, ओवा आणि काही थेंब निलगिरीचे तेल याची पोटली बनवून दिवसभर रात्रभर वास घेतला तर खरंच आॅक्सिजन पातळी वाढते का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याकरिता आम्ही आएमएचे डाॅक्टर अविनाथ भोंडवे यांच्याशी संपर्क साधल्या असता त्यांनी घरगुती उपाय करणे टाळावे, कोरोनाच्या काळात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलेही स्वतःहून उपाय करणे जीवावर बेतू शकते असे सांगितले.
यानंतर आम्ही आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ. हरिश पाटणकरण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नेहमीचा कापूर हा औषधासाठी वापरला जात नाही, भीमसेनी कापूरचा वापर होतो. पोस्टमध्ये सांगितलेल्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढेल याची खात्री देता येत नाही.
अधिक शोध घेतला असता आम्हाला आर्युवेदाचार्य परिक्षित शेवडे यांची फेसबुक पोस्ट आढळून आली. यात त्यांनी म्हटले आहे की,खालील उपाय वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारही करू नका.एकतर या फोटोत दाखवलेला केमिकल कापूर औषधाकरता वापरला जात नाही. तिथे भीमसेनी कापूरच लागतो.दुसरे म्हणजे दम लागत असणाऱ्या व्यक्तींनी थोड्याही अधिक प्रमाणात हा कापूर हुंगल्यास त्यांचा दम अधिक वाढू शकतो! अल्प मात्रेत प्रसरण आणि त्यानंतर मात्र आकुंचन करणे हा कापराचा गुणधर्म आहे. व्हाट्सएप विद्यापीठाच्या सल्ल्यांपासून सावधान!
संग्रहित
कापराचे दोन प्रकार आहेत एक भीमसेनी कापूर आणि दुसरा मानवनिर्मित केमिकलयुक्त कापूर. आपण जो दुकानातून आणतो, गोल वड्या असणारा तो केमिकलयुक्त कापूर आहे. हा कापूर ‘टरपेनटाईन’ या रसायनापासून बनवला जातो. भीमसेनी कापूर हा झाडापासून मिळतो.
पोस्टमध्ये दाखवण्यात आलेला कापूर हा केमिकल युक्त कापूर आहे. त्याचा औषधीय गुणधर्म नाही. त्यामुळे पोस्टमध्ये चुकीचा दावा केला गेला असल्याचे स्पष्ट होते. शिवाय कपूर, लवंग, ओवा आणि निलगिरी तेल रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तथापि, सौम्य श्वसन संसर्गामध्ये या थेरपीमुळे तुम्हाला बरे वाटते असा अहवाल देखील कुठेही प्रसिद्ध झालेला नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, व्हायरल पोस्टमध्ये चुकीचा दावा केला गेला आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, कापूर, लवंग, ओव्याच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढत असल्याचा दावा चुकीचा आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Claim Review: कापूर, लवंग ओव्याच्या पोटलीने आॅक्सिजन पातळी वाढते Claimed By: Social Media post Fact Check: False |
आयुर्वेदाचार्य परिक्षित शेवडे यांची फेसबुक पोस्ट- https://www.facebook.com/pareexit.shevde/posts/4080605785295757
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.