या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा तपास पुन्हा करणार असल्याचा, तसेच अर्णव गोस्वामीला पोलिसांनी मिरचीची धुरी दिल्याचा आणि मोठ्या संख्येने साधुंनी मुंबईकडे कूच केले असल्याचे दावे व्हायरल झाले. हे आणि इतर दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार असल्याचा दावा व्हायरल
पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजची चांगली बातमी महाराष्ट्र सीएम साहेबांना मनापासून धन्यवाद, मोठी बातमी महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाची फाईल उघडणार आहे. अमित शाह यांच्या अडचणीत वाढ. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. आहे. महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार नसल्याचे खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटल्याचा दावा
फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगाचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. याच दरम्यान ‘कुराण’वर भर संसदेत टीका करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील आहे. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

जो बायडेन यांनी डाॅ. मनमोहन सिंह यांना शपथविधीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले
जो बायडेन यांनी डाॅ. मनमोहन सिंह यांना शपथविधीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीला भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मुख्य अतिथी आहेत. माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेले नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अर्णब गोस्वामींना पोलिसांनी मिरचीची धुरी दिल्याची बातमी व्हायरल
रिपब्लिक भारत टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना पोलिसांनी उलटे टांगून मिरचीची धुरी दिल्याची बातमी व्हायरल झाली आहे. सनातन प्रभातच्या नावाने व्हायरल झालेल्या या बातमीत म्हटले आहे की, अर्णव गोस्वामींना उलटे टांगून खालून मिरचीची धुरी दिली. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सनानत प्रभातची बातमीचे कात्रण माॅर्फ केल्याचे आढळले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

साधुंनी मुंबईकडे कूच केलेले असल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
साधूंनी मुंबईकडे कूच केले असल्याचा दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हजारों साधुंची मोठी गर्दी दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार या तुफानाला रोखू शकत नाही. साधू समाजाची मुंबईकडे कूच करण्याची तयारी. पडताळणीत व्हायरल व्हिडिओ मागील वर्षी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्या दरम्यानचा असल्याचे आढळून आले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.