Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : रोहित शर्माचा बुर्ज खलिफावर फोटो ते लष्काराचे POK मध्ये...

Weekly Wrap : रोहित शर्माचा बुर्ज खलिफावर फोटो ते लष्काराचे POK मध्ये पिन पाॅईंट स्ट्राईक

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माचा फोटो जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर झळकला असल्याचा तसेच महाराष्ट्र सरकार 55 वर्षांवरील शेतक-यांना तीन हजार रुपये पेन्शन देणार असल्याचा दावा आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माचा फोटो बुर्ज खलिफावर झळकला

आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माचा फोटो बुर्ज खलिफावर झळकला असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, बुर्ज खलिफावर रोहित शर्मा, जगातील पहिला क्रिकेटर आणि तिसरा भारतीय ज्याचा फोटो बुर्ज खिलाफावर झळकला आहे.  पडताळणी पोस्टमधील दावा असत्य असल्याचे आढळून आले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

भारतीय वंशाच्या अहमद खान यांची बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नीसोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात येतोय. दावा केला जातोय की ही व्यक्ती भारतीय वंशाचे अहमद खान असून, त्यांची जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण हे सत्य नाही अहमदखान यांचा जो बायडन सोबतचा पाच वर्षापूर्वीचा फोटो आहे शिवाय खान यांची बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली नाही. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

ओवेसी आणि शहा यांच्यात सिक्रेट डील झाल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांचा व्हिडिओ व्हायरल

बिहार निवडणुकीत एआयएमआयएमचे नेते ओवेसी आणि भाजप नेते अमित शहा यांची सिक्रेट डील झाली होती असा दावा करणारे पत्र आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाचून दाखवत असल्याचे यात दिसत आहे. पडताळणीत हे सिद्ध झाले की, केजरीवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बिहार निवडणूक 2020 संदर्भातील नसून 2015 साली बिहार निवडणुकीसंदर्भात 2016 साली केलेल्या दाव्याचा आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

महाराष्ट्रातील शेतक-यांना पेन्शन मिळणार असल्याचा मेेसेज व्हायरल

महाराष्ट्रातील शेतक-यांना पेन्शन मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला असून यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आता 55 वर्ष पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत. सोबत जी.आर. देत आहे. आपण आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांना माहीती द्याल ही अपेक्षा व विनंती. पडताळणीत शेतक-यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार असल्याचा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. तीन वर्षांपूर्वी देखील हा दावा व्हायरल झाला आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

लष्कराने पीओकेत ‘पिन पॉईंट स्ट्राइक’ केली असल्याची बातमी प्रसिद्ध

पीटीआयचा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या या बातमीत म्हटले आहे की, भारतीय सैन्याने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचे लॉन्चिंग पॅड उद्वस्त केले आहे. पडताळणीत भारतीय लष्काराने 19 नोव्हेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिन पाॅईंट स्ट्राईक केलेली नसल्याचे तसेच माध्यमांत चुकीची बातमी प्रसिद्ध झाली असल्याचे सत्य उघड झाले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular