Monday, April 29, 2024
Monday, April 29, 2024

HomeFact Checkइंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता?...

इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता? जाणून घ्या सत्य

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
इंदिरा गांधींनी 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी एक स्टॅम्प जारी केला होता, ज्यामध्ये एक मुस्लिम कुस्तीपटू हिंदू टॉप स्ट्रायकरला मारहाण करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

Fact
इंडिया पोस्टवरील स्टॅम्पच्या वर्णनानुसार, स्टॅम्पमध्ये पैलवानांचा धर्म नमूद केलेला नाही. जानकी यांनी काढलेल्या पेंटिंगच्या आधारे ए. रामचंद्रन यांनी त्याची रचना केली होती जी आता राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे संरक्षित आहे. हा स्टॅम्प पर्शियन प्रभाव असलेले मुघल शैलीतील चित्रावर आधारित आहे.

चीनच्या हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांनी भारतातील सोशल मीडिया संभाषणांवर वर्चस्व गाजवले आहे, युजर्स देशाचा जयजयकार करत आहेत आणि क्रीडा चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. या संदर्भात, स्टॅम्पचे एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये युजर्सचा दावा आहे की तो नवी दिल्ली येथे झालेल्या 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जारी करण्यात आला आहे. पोस्टमध्ये पुढे असा आरोप करण्यात आला आहे की या स्टॅम्पमध्ये मुस्लिम कुस्तीपटू हिंदू कुस्तीपटूला मारहाण करत असल्याचे दाखवले आहे आणि हा प्रकार सनातन धर्माबद्दल काँग्रेसची वृत्ती दर्शविणारा ठरतो.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प काढला होता? जाणून घ्या सत्य

Fact check/ Verification

सुरुवातीला, न्यूजचेकरने व्हायरल स्टॅम्पचे बारकाईने विश्लेषण केले.

प्रतिमेत दाढी असलेला कुस्तीपटू दुसर्‍या कुस्तीपटूला जमिनीवर फेकताना दिसत आहे. ज्या कुस्तीपटूला हवेत दाखविलेला आहे त्याच्या डोक्यावर हिंदू पुरुषांमध्ये असलेल्या परंपरागत प्रथेप्रमाणे केसांचा तुकडा (शेंडी) दाखविण्यात आली आहे. बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की, ज्या कुस्तीपटूने दुसऱ्या कुस्तीपटूला वर उचलून धरले आहे त्याच्याही केसांचा एक तुकडा शेंडी सारखाच बांधलेला आहे.

त्यानंतर आम्ही स्टॅम्पचा रिव्हर्स इमेज शोध केला आणि विविध वेबसाइट्सवर सूचीबद्ध केलेले स्टॅम्प सापडले. ज्यामध्ये IndphiliaStampex India आणि Olympics Council of Asia यांचा समावेश आहे. जेथे अशी माहिती मिळाली की, हे स्टॅम्प खरोखरच नवी दिल्ली येथे झालेल्या 9व्या आशियाई खेळांच्या स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आले होते.

पुढील संशोधनावर, आम्हाला Colnect.com वर एक पृष्ठ देखील सापडले, ज्यामध्ये या स्टॅम्पचे तपशील होते. पृष्ठावर कलाकाराची ए रामचंद्रन म्हणून नोंद केली आहे.

इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प काढला होता? जाणून घ्या सत्य

आम्ही माहिती वापरली आणि India Post website वर सूचीबद्ध केलेले स्टॅम्प तपशील ऑनलाइन शोधले.

“स्टॅम्प कुस्ती या क्रीडाप्रकाराचे चित्रण करते. देखावा फुलांची झाडे आणि रोपट्यांच्या साथीने सोनेरी मैदानावर आहे. चित्रकलेच्या शैलीवर पर्शियन कलेचा प्रभाव आहे. हे काम 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या मुघल शैलीमध्ये केले गेले आहे आणि बहुधा पर्शियन कलेची मूळची प्रत आहे. जानकी यांनी काढलेले हे पेंटिंग नॅशनल म्युझियम, नवी दिल्ली येथे उपलब्ध आहे,” इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर उपलब्ध वर्णन ही माहिती देते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्टॅम्पच्या वर्णनात कोणत्याही धार्मिक पैलूंचा उल्लेख नाही.

Conclusion

9व्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान जारी करण्यात आलेल्या स्टॅम्पला कोणताही सांप्रदायिक रंग नाही आणि तो जानकीने मुघल शैलीत केलेल्या जुन्या पेंटिंगवर आधारित आहे. त्यात मुस्लिम पैलवान हिंदू कुस्तीपटूला मारहाण करत असल्याचे दाखविल्याचा दावा खोटा आहे.

Result: False

Sources
Item listing on Indphilia
Item listing Stampex India
Item listing on Olympics Council of Asia
Item listing on Colnect.com
Item listing on India Post


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी पंकज मेनन यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular