महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आठवडाभरात असंख्य फेक दावे झाले. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, त्यांनी वरळीतून माघार घेतली, असा दावा करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आलेली पहिल्या इन्स्टोलमेंटची पुण्यात जप्त केलेली रक्कम, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा दावा करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

आदित्य ठाकरेंनी वरळीतून माघार घेतली?
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, त्यांनी वरळीतून माघार घेतली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.

हा व्हिडीओ पुण्यात जप्त केलेल्या रक्कमेचा नाही
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आलेली पहिल्या इन्स्टोलमेंटची पुण्यात जप्त केलेली रक्कम, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले?
मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले?
विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा