Thursday, March 23, 2023
Thursday, March 23, 2023

घरFact CheckWeekly Wrap: पेट्रोल पंप वर किचेन वाटणाऱ्या लुटारूंचा संदेश, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या जडी...

Weekly Wrap: पेट्रोल पंप वर किचेन वाटणाऱ्या लुटारूंचा संदेश, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या जडी बुटीची पोस्ट आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

या आठवड्यात सर्वत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला तो पाण्याच्या प्रवाह विरोधात तरंगणाऱ्या जडी बुटीचा दावा. पेट्रोल पंपावर काही लुटारू किचेन वाटून आपला पाठलाग करतात आणि आपल्याला लुटू शकतात, हा समाजात भीती पसरविणारा दावा व्हायरल झाला होता. नासाने सूर्यातून येणार आवाज रेकॉर्ड केला असून त्यातून ओम असा आवाज येतो अशी पोस्ट पसरविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले असता त्यांनी आपल्या आई सोबत पत्नीचीही भेट घेतल्याचा दावा करण्यात आला. नटराज पेन्सिल कंपनीत पॅकेजिंग चा जॉब आहे आणि घरबसल्या पॅकेजिंग करून आपण ३० हजार रुपये कमवू शकता असा दावा करून अनेकांना ठकविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

पेट्रोल पंप वर किचेन वाटणाऱ्या लुटारूंचा संदेश, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या जडी बुटीची पोस्ट आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

ही जडीबुटी चमत्कारी आहे ?

हिमालयात एक जडी बुटी मिळाली असून ती पाण्याच्या प्रवाहाविरोधात तरंगते असा दावा करण्यात आला. आमच्या तपासणीत हा दावा खोटा आढळला.

मोदी आपल्या पत्नीला भेटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर गेले असता आपल्या आई सोबत पत्नी जशोदाबेन हिलाही भेटले, असा दावा एका फोटो च्या माध्यमातून करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा फोटोत फेरफार करून करण्यात आल्याचे उघड झाले.

नटराज घरबसल्या जॉब देत नाही

नटराज कंपनीत पॅकेजिंग चा जॉब आहे, संपर्क करा असे सांगून संपर्क साधणाऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सर्वत्र सुरु झाला आहे, यासंदर्भात आम्ही तथ्य तपासले असता नटराज कंपनी कोणताही जॉब देत नसून हा स्कॅम असल्याचे उघड झाले.

हे किचेन देऊन फसविले जात नाही

पेट्रोल पंप आणि शॉपिंग मॉल मध्ये किचेन देऊन फसविले जात असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. आमच्या तपासात समाजात दिशाभूल करून भीती निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे उजेडात आले.

सूर्यातून ओम असा आवाज येतो?

नासा या संस्थेकडून सूर्यातून येणाऱ्या आवाजाचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून सूर्यातून ओम असा आवाज येतो असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला असून सूर्यातून येणाऱ्या आवाजाला कोणतेही शाब्दिक वर्णन करता येत नाही, हे सिद्ध झाले आहे.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular