Fact Check
Weekly Wrap: हाय अलर्ट, मोदींवरील लेख ते पहलगाम हल्ल्याशी जोडलेल्या दाव्यांचे फॅक्ट चेक
एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही अनेक फेक दाव्यांचा ठरला. पहलगाम हल्ल्याशी जोडलेले आणि इतर अनेक दावे करण्यात आले. पहलगाम मध्ये भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आदिलचा हा मृतदेह आहे असे सांगत एका फोटोच्या माध्यमातून दावा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या AFBCWF बँक खात्यातील देणग्या सैन्य आणि निमलष्करी दलांसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरल्या जातात असा दावा करण्यात आला. न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर लिहिलेला लेख असे सांगत एक टेक्स्ट मेसेज व्हायरल करण्यात आला. हवामान खात्याने २९ मे ते २ जुनसाठी केला हाय अलर्ट जारी, असा दावा करण्यात आला. बजरंग दलाने मशीद जाळली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

हा मृतदेह पहलगाममध्ये भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आदिलचा?
पहलगाम मध्ये भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आदिलचा हा मृतदेह आहे असे सांगत एका फोटोच्या माध्यमातून दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

भारतीय सैन्याच्या बँक खात्यातील देणग्या शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरल्या जातात?
भारतीय सैन्याच्या AFBCWF बँक खात्यातील देणग्या सैन्य आणि निमलष्करी दलांसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरल्या जातात असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर हा लेख लिहिलेला नाही
न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींवर लिहिलेला लेख असे सांगत एक टेक्स्ट मेसेज व्हायरल करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

हवामान खात्याने २९ मे ते २ जुनसाठी केला हाय अलर्ट जारी?
हवामान खात्याने २९ मे ते २ जुनसाठी केला हाय अलर्ट जारी, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

बजरंग दलाने मशिदीला आग लावली?
बजरंग दलाने मशीद जाळली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.