Thursday, May 30, 2024
Thursday, May 30, 2024

HomeFact CheckFact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा...

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे.

Fact

व्हायरल झालेली पेपर क्लिपिंग बनावट आहे.

दैनिक भास्करची एक क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सर्वेक्षण दाखवण्यात आले आहे. या कथित सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी पुढे असल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हे सर्वेक्षण खोटे आहे. दैनिक भास्करनेही त्याचे खंडन करत याला बनावट असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या क्लिपिंगमधील मुख्य बातमी अशी आहे की, “मेगा सर्वेक्षणाचे निकाल जाहीर, 10 राज्यांमध्ये इंडिया आघाडी पुढे.” या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, खाली हेडिंग म्हणूनही लिहिले आहे, “नील्सन-दैनिक भास्करचे मेगा सर्वेक्षण उघड झाले”. तसेच, उपशीर्षकामध्ये लिहिले आहे, “इंडिया आघाडी एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी सज्ज, भाजप शासित राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे”. पोस्टचे संग्रहण येथे पाहिले जाऊ शकते.

ही वृत्तपत्र क्लिपिंग अनेक अधिकृत X हँडलद्वारे देखील शेयर केली गेली आहे.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या
Courtesy: X/SurabhiMaradiya

व्हायरल दाव्यांसह इतर पोस्टचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पहा.

Fact Check/ Verification

व्हायरल क्लिपिंगकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर, आम्हाला 13 एप्रिल 2024 तारीख आणि भोपाळ ही आवृत्ती दिसली. म्हणून, आम्ही त्या तारखेचा आणि आवृत्तीचा ई-पेपर शोधला.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या
Courtesy: Dainik Bhaskar

ई-पेपरच्या पान क्रमांक 1 वर बारकाईने पाहिल्यावर असे आढळून आले की, खऱ्या ई-पेपरमध्ये कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणाचा उल्लेख नाही, परंतु सर्वेक्षण आणि त्यासंबंधित बातम्या ज्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत त्यामध्ये नमूद केले आहे. खऱ्या ई-पेपरमध्ये भाजपच्या जाहिराती आणि भोपाळमधील नुकत्याच झालेल्या पावसाचा उल्लेख आहे.

याव्यतिरिक्त, आम्हाला हे देखील आढळले आहे की व्हायरल क्लिपिंगमधील सर्वेक्षणाच्या आसपासच्या बातम्या आणि मांडणी मूळ ई-पेपर सारखीच आहे. सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यासाठी फक्त मधली जागा संपादित केली आहे. खालील चित्रात तुम्ही हा फरक सहज पाहू शकता.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या

आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल क्लिपिंग एडिट केले आहे. यानंतर आम्ही या प्रकरणावर दैनिक भास्करने दिलेली प्रतिक्रिया देखील शोधली. यादरम्यान, आम्हाला दैनिक भास्करच्या अधिकृत X खात्यावरून एक ट्विट प्राप्त झाले.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या
Courtesy: X/Dainik Bhaskar

13 एप्रिल 2024 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये दैनिक भास्करने लिहिले की, “हे सर्वेक्षण खोटे आहे, जे काही समाजकंटकांनी तयार केले आहे… दैनिक भास्कर अशा कोणत्याही सामग्रीवर दावा करत नाही… अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी.”

याशिवाय, आम्हाला दैनिक भास्करचे संपादक एल.पी. पंत यांचे एक ट्विट देखील आढळले, ज्यात त्यांनी सर्वेक्षण आणि क्लिपिंग बनावट असल्याचे म्हटले होते.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या
Courtesy: X/Pantlp

Conclusion

दैनिक भास्करची ही कथित पेपर क्लिपिंग बनावट असल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. मूळ क्लिपिंगमध्ये सर्वेक्षण उपलब्ध नाही.

Result: False

Our Sources
Dainik Bhaskar E-Paper on 13th April 2024
Tweet by Dainik Bhaskar on 13th April 2024
Tweet by Editor LP Pant on 13th April 2024

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular