Authors
मागील आठवडाही सोशल मीडियावरील खोट्या पोस्टनी गाजला. हिमालयात दिसणारा मणिदर्शन सूर्योदयाचा व्हिडीओ असा दावा झाला. दक्षिणेतल्या नेल्लोर येथे पळविलेल्या जैन मुलीला नोकरी जाण्याच्या भीतीने मुस्लिमांनी परत आणून दिले. असा दावा करण्यात आला. ज्ञानवापी शिवलिंगाचे कार्बन डेटिंग झाले असून ते आठ हजार वर्षे जुने आहे. असा दावा करण्यात आला. नाशिक येथील मुलगा मुंबई येथील रेल्वेस्थानकावर सापडला आहे, असे सांगत एक दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हा हिमालयातील ‘मणिदर्शन सूर्योदय’ नाही
मणिधरसन नावाचा चमत्कारिक सूर्योदय आहे जो हिमालयात पहाटे ३:३० वाजता होतो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
नोकऱ्या जाण्याच्या भीतीने मुस्लिम समाजाने पळविलेल्या हिंदू जैन मुलीला परत केले?
नोकऱ्या जाण्याच्या भीतीने मुस्लिम समाजाने पळविलेल्या हिंदू जैन मुलीला परत केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघडकीस आले.
ज्ञानवापी ‘शिवलिंग’चा कार्बन डेटिंगचा अहवाल आला नाही
कार्बन डेटिंगच्या अहवालानुसार काशी विश्वनाथ शिवलिंग 8 हजार वर्षे जुने आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
आठ महिन्यांपूर्वी सापडलेला मुलगा पालकांकडे सुपूर्द
मुंबईच्या रेल्वेस्थानकावर दोन वर्षीय मुलगा पालकांविना सापडला असून तो नाशिकचा आहे, असे सांगत एक दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीचे संदर्भ देऊन अकारण केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in