Authors
सोशल मीडियावरील अनेक बनावट दाव्यांनी मागील आठवडा गाजला. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा करण्यात आला. ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना दरमहा 100 रुपये भत्ता मिळत असे, असा दावा करण्यात आला. 31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा झाला. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले?
पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
महात्मा गांधींना हा भत्ता वैयक्तिकरित्या मिळाला होता?
ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना दरमहा 100 रुपये भत्ता मिळत असे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होणार नाहीत
31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केली?
हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केली असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा