Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल करण्यात आले. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा करण्यात आला. कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते. असा दावा करण्यात आला. सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका छायाचित्रात दिसत आहेत. असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतमातेचा अपमान केला. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला?
भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते?
कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत
फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
राहुल गांधी यांनी भारत मातेचा अपमान केला नाही
राहुल गांधी यांनी भारत मातेचा अपमान केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करण्यासाठी झाल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा