Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeFact CheckFact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या...

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे

Claim
भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.
Fact
या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सरकारी यंत्रणांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावर सध्या भारताच्या जीडीपी संदर्भात एक दावा केला जात आहे. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. असा हा दावा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून हा दावा केला आहे.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@Dev_Fadnavis

“गतिमान, दूरदर्शी नेतृत्व असे दिसते! आपला #NewIndia सुंदरपणे प्रगती करत आहे असे दिसते! आपल्या राष्ट्राने $4 ट्रिलियन जीडीपीचा टप्पा ओलांडल्याबद्दल माझ्या भारतीय सहकाऱ्यांचे अभिनंदन! तुमच्यासाठी अधिक शक्ती, माननीय पंतप्रधान तुमच्याबद्दल अधिक आदर @narendramodi जी! economy #India” असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check/Verification

Newschecker ने व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला असे सांगणारा दावा खरा आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही गुगलवर सर्च केले. दरम्यान सरकारी पातळीवर अशी कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.

IMF चे म्हणणे काय?

जीडीपी आणि इतर माहितीसंदर्भात नेहमीच IMF अर्थात युनायटेड नेशन्सचा ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ अधिकृत माहिती देत असतो. कोणत्या देशाचा जीडीपी किती आहे, यासंदर्भात अधिकृत माहितीसाठी याच यंत्रणेला संदर्भ म्हणून पाहिले जाते. यासाठी आम्ही या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहणी केली.

“भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला” या किवर्डसच्या माध्यमातून IMF अर्थात युनायटेड नेशन्सचा ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’च्या वेबसाईटवर पाहणी केली. आम्हाला भारताच्या आर्थिक प्रगतीवर आधारित अनेक लेख सापडले. मात्र ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाबद्दल याठिकाणी आम्हाला इतर माहिती मिळाली. मात्र व्हायरल दाव्याचा उल्लेख कोठेही आढळला नाही.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे
Screengrab of IMF Website

भारतीय अधिकृत यंत्रणा काय सांगते?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारे GDP डेटा अधिकृतपणे गोळा केला जातो आणि प्रकाशित केला जातो जो सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. ही संस्था त्रैमासिक आकडे प्रसिद्ध करते आणि नंतर वार्षिक अंदाज प्रदान करते. अशी माहिती आम्हाला मिळाली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तिच्या प्रगतीच्या अधिकृततेवर हीच संस्था भाष्य करू शकते, यासाठी आम्ही NSO संदर्भातील घोषणा संदर्भात mospi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहणी केली. तेथेही आम्हाला ४ ट्रिलियन जीडीपी टप्पा पार केल्यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा आढळली नाही. संस्थेच्या प्रेस रिलीज या सदरात आम्ही शोधले. भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात इतका मोठा अपडेट असेल तर तो याठिकाणी आढळला असता, मात्र तसे काहीच पाहायला मिळाले नाही. संस्थेने आपली शेवटची प्रेसनोट सप्टेंबर महिन्यात रिलीज केल्याचेही येथे दिसून आले.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे
Screengrab of mospi.gov.in

व्हायरल इमेजचा शोधात हे सापडले

दावा करताना एक इमेज वापरली गेली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही व्हायरल दाव्यातील इमेजला रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले असता, आम्हाला @livestream07 या युट्युब चॅनेलवरील व्हिडिओकडे नेले. IMF च्या निर्देशानुसार GDP चे LIVE प्रक्षेपण हे चॅनेल करते असे डिस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे. याच चॅनेलवरील स्क्रीनशॉटचा वापर करून दावा करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान संबंधित युट्युब चॅनेलच्या बायोमध्ये आम्हाला या चॅनेलच्या फेसबुक पेजची लिंक सापडली. आम्ही या पेजवर जाऊन पाहणी केली असता LiveStream07 हे पेज बांगलादेश येथील ढाका येथून ऑपरेट होत असल्याचे दिसून आले. संबंधित पेजवर युट्युब चॅनेलची लिंकही पाहायला मिळाली. दरम्यान सदर पेज IMF शी संलग्न नसल्याने त्याच्या अधिकृततेबद्दल संशय असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे

भारताच्या जीडीपीची सध्यस्थिती काय?

भारताच्या जीडीपीची सध्यस्थिती काय आहे? याचा शोध आम्ही घेतला. आम्हाला @capitalmind_in या अर्थविषयक अपडेट्स देणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि सीईओ @deepakshenoy यांनी यासंदर्भात केलेले एक ट्विट पाहायला मिळाले.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@deepakshenoy

“दुर्दैवाने भारताचा जीडीपी अजून ४ ट्रिलियन डॉलर नाही. आम्ही जूनपर्यंत सुमारे $3.38 ट्रिलियन पर्यंत होतो आणि आता शक्यतो $3.45 ट्रिलियन आहोत.” असे यामध्ये लिहिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

आम्ही यासंदर्भात अनेक मीडिया रिपोर्ट्स धुंडाळले. abp न्यूज, न्यूज 18 हिंदी, CNBC आवाज, द हिंदू, WIRE, PTI आदी माध्यमांनी दिलेल्या बातम्या वाचल्या. यामध्ये ४ ट्रिलियन जीडीपी ची अफवा असून यासंदर्भात कोणतीच सरकारी अधिकृत सूचना नसल्याची माहिती आम्हाला मिळाली.

काय आहे जीडीपी?

जीडीपी हा अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वांत सामान्य निर्देशकांपैकी एक आहे. जीडीपी देशामध्ये विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकत्रित मूल्य दर्शवते. यात देशाच्या हद्दीत राहून उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे.

Conclusion

भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे, या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सरकारी यंत्रणांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Official Website of IMF
Official Website of mospi
Live Streaming of Youtube@livestream07
Tweet made by @deepakshenoy on November 19, 2023
Google Search


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular