जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडाही अनेक फेक पोस्टनी चर्चेत राहिला. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात एक साधु अग्नीस्नान करत असल्याचा दावा करण्यात आला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो, असा दावा करण्यात आला. रायबरेलीमध्ये एका मुस्लिम तरुणाने महाकुंभाच्या बॅनरवर लघवी केली, असा दावा करण्यात आला. काळ्या शाईने लिहिलेले चेक यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

आगीत झोपलेल्या साधूचा व्हिडिओ प्रयागराजमधील नाही
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात एक साधु अग्नीस्नान करत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

गांधी कुटुंबीय जेवतानाचा फोटो व्हिएतनाममधील?
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

महाकुंभाच्या बॅनरवर एका मुस्लिम तरुणाने लघवी केली?
रायबरेलीमध्ये एका मुस्लिम तरुणाने महाकुंभाच्या बॅनरवर लघवी केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.

चेकवर काळी शाई वापरण्यास बंदी?
काळ्या शाईने लिहिलेले चेक यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा