Authors
लोकसभा निवडणुकीला जोडून मागील आठवड्यात अनेक दावे व्हायरल झाले. प्रॉक्सी मतदानामुळे मणिपूर मतदान केंद्रात नागरिकांनी ईव्हीएमची मोडतोड केल्याचा दावा करण्यात आला. उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, असा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला, असा दावा करण्यात आला. भाजपचे सरकार आल्यास एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू, असे अमित शहा म्हणाले. असा दावा झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मत दिल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी बुरखा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीला पकडले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
प्रॉक्सी मतदानामुळे मणिपूर मतदान केंद्रात नागरिकांनी ईव्हीएमची मोडतोड केली?
प्रॉक्सी मतदानामुळे मणिपूर मतदान केंद्रात नागरिकांनी ईव्हीएमची मोडतोड केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना बोलू दिले नाही?
उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे
एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू असे अमित शहा म्हणाले?
भाजपचे सरकार आल्यास एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू, असे अमित शहा म्हणाले. असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
‘व्होट जिहाद’ करणाऱ्या बुरखाधारीला पोलिसांनी पकडले?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मत दिल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी बुरखा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीला पकडले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा