Authors
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडाही सोशल मीडियावरील फेक व्हायरल पोस्टमुळे गाजला. रेल्वेवर विविध मार्गानी जिहाद करणाऱ्यांची मजल आता वंदे भारतच्या काचा फोडण्यापर्यंत गेली आहे, असा दावा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केली, असा दावा झाला. बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली, असा दावा करण्यात आला. हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
वंदे भारतच्या काचा फोडण्यात आल्या?
रेल्वेवर विविध मार्गानी जिहाद करणाऱ्यांची मजल आता वंदे भारतच्या काचा फोडण्यापर्यंत गेली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कर्नाटक पोलिसांनी गणेश मूर्तीला अटक केली?
गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली?
बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर आपला विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले?
हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा