Saturday, March 25, 2023
Saturday, March 25, 2023

घरFact CheckWeekly Wrap: नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, तसेच या आठवड्यातील इतर...

Weekly Wrap: नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

२०२३ हे नवीन वर्ष अनेक चमत्कारिक वैशिष्ठये घेऊन आले आहे. हा दावा या आठवड्यात गाजला. चीन पाठोपाठ भारतातही कोरोनाचा नवा व्हेरियंट कहर करणार असा दावा करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भारत सरकार २००० च्या नोटा बंद करणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान मोदींनी १० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे असा संदेश पसरला होता. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका टीसी चा शॉक लागून मृत्यू झाल्याचा दावा व्हायरल झाला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, २००० च्या नोटा होणार बंद, शॉक लागून टीसी चा मृत्यू

२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत?

२०२३ या वर्षात अनेक चमत्कारिक वैशिष्टये आहेत. या वर्षी दर महिन्यात विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार आहे आणि या वर्षीचा फेब्रुवारी महिना ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार आहे. असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, २००० च्या नोटा होणार बंद, शॉक लागून टीसी चा मृत्यू

आरबीआय २००० च्या नोटा बंद करणार?

१ जानेवारी पासून आरबीआय २००० च्या नोटा बंद करणार असून त्याच दिवशी नव्या १००० च्या नोटा जारी करणार आहे. असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.

नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, २००० च्या नोटा होणार बंद, शॉक लागून टीसी चा मृत्यू

XBB व्हेरिएंट धोकादायक आहे?

कोविड- ओमिक्रॉन एक्सबीबी हा नवीन व्हायरस डेल्टा प्रकारापेक्षा ५ पट जास्त विषाणूजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे असे सांगणारे मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. आमच्या तपासात या व्हायरल मेसेजला काहीच आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, २००० च्या नोटा होणार बंद, शॉक लागून टीसी चा मृत्यू

मोदींनी ती घोषणा केली नाही

पीएम मोदींनी प्रत्येक नागरिकाला १० लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचा धक्कादायक दावा व्हिडिओद्वारे केला जात आहे. आमच्या तपासात हा दावा चुकीचे संदर्भ वापरून करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, २००० च्या नोटा होणार बंद, शॉक लागून टीसी चा मृत्यू

तो टीसी आहे सुखरूप

एका रेल्वे स्थानकावर झालेल्या घटनेत अंगावर विजेची तयार पडल्याने टीसी मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तो टीसी सुखरूप असून हा दावा अंशतः खोटा असल्याचे आमच्या तपासात दिसून आले आहे.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular