Authors
Claim
विकिलिक्सने ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या काळ्या पैशाची यादी जाहीर केली आहे.
Fact
विकिलिक्सने अशी कोणतीही यादी जाहीर केलेली नाही.
ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या भाजप नेत्यांच्या काळ्या पैशाची यादी विकिलिक्सने जाहीर केली असे सांगणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव झाला आहे, तर मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांच्या पराभवानंतर विकिलिक्सने ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या काळ्या पैशाची यादी जाहीर केल्याचा दावा करत भाजप नेत्यांची यादी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. तथापि, तपासाअंती आम्हाला आढळून आले की हा दावा खोटा आहे.
भाजप नेत्यांची यादी सोशल मीडियावर शेअर (आर्काइव) केली जात आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव आणि स्मृती इराणी यांच्यासह 24 जणांची नावे आहेत. या यादीत भाजप नेत्यांच्या नावांसोबतच कोट्यवधी रुपयांची माहितीही देण्यात आली आहे. ही यादी शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, “मोदींची काळी डायरी समोर आली आहे… ब्रिटनमधील सरकार उलथताच, ऋषी सुनक यांच्या पराभवानंतर मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचा काळा पैसा बाहेर येऊ लागला उघड झाले आहे. मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचा काळा पैसा 14 वर्षात शंभरपटीने वाढला आहे.”
अशा पोस्टचे संग्रहण येथे आणि येथे पहा.
आम्हाला आमच्या WhatsApp टिप लाइन (9999499044) वर देखील हा दावा प्राप्त झाला आहे.
Fact Check/ Verification
या दाव्याचा तपास करण्यासाठी, आम्ही Google वर संबंधित कीवर्ड शोधले. परंतु परिणामी, विकिलिक्सने अशी यादी जाहीर करण्याशी संबंधित कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आम्हाला आढळले नाहीत.
आता आम्ही विकिलिक्सची अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइट एक्सप्लोर केली. तेथेही आम्हाला अशी कोणतीही यादी जाहीर झाल्याची माहिती मिळाली नाही.
तपासादरम्यान, जेव्हा आम्ही X वर संबंधित कीवर्ड शोधले, तेव्हा आम्हाला या यादीसंदर्भातील समान दाव्यांसह शेकडो पोस्ट आढळल्या. आम्हाला आढळले की 2011 पासून, अशा याद्या नेत्यांच्या बदललेल्या नावांसह विकिलिक्सने जारी केलेली यादी असे सांगत शेयर केल्या गेल्या आहेत. हा दावा 2011, 2012, 2013, 2014, 2015 आणि 2016 या वर्षांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या नावे शेअर करण्यात आला आहे.
तपासादरम्यान, आम्हाला आढळून आले की 2011 मध्ये हा प्रकार प्रथमच व्हायरल झाला होता. त्या यादीत तत्कालीन केंद्र सरकारच्या (यूपीए) मंत्र्यांची नावे होती. त्यानंतर विकिलिक्सने या प्रकाराची यादी बनावट असल्याचे घोषित केले होते.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात विकीलीक्सच्या नावाने व्हायरल होत असलेला हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Sources
Official X handle of Wikileaks.
Official Website of Wikileaks.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा