Thursday, September 29, 2022
Thursday, September 29, 2022

घरFact Checkजगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड कर्नाटकात आहे?

जगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड कर्नाटकात आहे?

सोशल मीडियात सध्या एका झाडाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो कर्नाटकमधील बिलीगिरांगना बेट्टा येथील तुळशीच्या झाडाचा असून हे जगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड आहे.

संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल होत असलेल्या पोस्टची पडताळणी करण्यासाठी आम्ही काही किवर्ड्सची मदत घेतली. यात आम्हाला Guinness world records च्या वेबसाईटवर जगातील सर्वात मोठ्या तुळशीच्या झाडाबद्दल माहिती मिळाली. वेबसाईटवरील माहितीनुसार जगातील सर्वात उंच तुळशीच्या झाडाची नोंद एका ग्रीक महिलेच्या घरात असलेल्या तुळशीच्या रोपाची आहे. त्याची लांबी 10 फूट 11.5 इंच आहे. वेबसाइटवर याचा फोटो देखील आहे. जो व्हायरल फोटोपेक्षा वेगळा आहे.

अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही शोध पुढे सुरुच ठेवला असता आम्हाला mathrubhumi.com या वेसाईटवर 16 आॅगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. या बातमीनुसार विलक्षण उंचीवर वाढलेली पवित्र तुळशीची वनस्पती गिनीज रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. एजिक्का येथील मूळ रहिवासी अनिलकुमारच्या घरात ही वनस्पती वाढत आहे स व सध्या तिची उंची 11फूट 1 इंच आहे.

व्हायरल होत असलेल्या झाडाचा फोटो अनल कुमार यांच्या अंगणातील तुळशीच्या रोपापेक्षा वेगळा असल्याने आम्ही याबाबत अधिक शध घेण्याचा प्रय्नत केला असता आम्हाला 03 जून 2020 रोजीची एबीपी न्यूजची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार आतापर्यंतचे सर्वात मोठे तुळशीचे रोप ग्रीसमध्ये आहे. ज्याची उंची 10 फूट 11 इंच आहे.मात्र प्रश्न आस्थेचा असल्याने वैदिक पंडित डॉक्टर नागार्जुन शर्मा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की व्हायरल फोटो हा तुळशीच्या झाडाचा नाही. तुळशीचा बुंधा इतका मोठा नसतो. हे झाड तुळशी सारखे दिसत आहे पण तुळस नाही.”

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल होत असलेला फोटो जगातील सर्वात मोठ्या तुळशीच्या झाडाचा नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review:  जगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड कर्नाटकमध्ये आहे.
Claimed By: Viral Post
Fact Check: False

Our Sources

एबीपी न्यूज –https://www.abplive.com/news/india/worlds-largest-tulsi-tree-tall-as-mango-tree-fact-check-1418200

गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड्स- https://www.guinnessworldrecords.com/news/2017/11/10-tasty-plant-based-records-to-celebrate-world-vegan-day-500726


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular