Authors
Claim
भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दुर्लक्ष केले.
येथे एक्स-पोस्ट आणि संग्रहण पहा.
Fact
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले. यादरम्यान आम्हाला 28 जुलै 2024 रोजी ANI ने शेअर केलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये आपण व्हायरल क्लिपचा भाग पाहतो, जिथे योगी आदित्यनाथ वगळता इतर मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून अभिवादन करत आहेत.
पुढील तपासात, आम्हाला भाजपच्या अधिकृत X खात्यातून 28 जुलै 2024 रोजी केलेली पोस्ट (संग्रहण) आढळली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालय, नवी दिल्ली येथे भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीचा आहे. या 20 सेकंदाच्या व्हिडिओतील पहिल्या सेकंदात भाजप मुख्यमंत्र्यांच्या रांगेत उभे असलेले योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात जोडून स्वागत करताना दिसत आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदीही हात जोडतात, पण तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांचा हात खाली येतो. ANI ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फक्त तोच भाग दिसत होता जिथे पंतप्रधान मोदी हात जोडतात आणि योगी आदित्यनाथ यांचे हात खाली येतात.
तपासादरम्यान आम्हाला ही क्लिप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही सापडली. व्हिडिओ पाहिल्यावर हे स्पष्ट होते की योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या आगमनानंतर शुभेच्छा दिल्या होत्या, जे वेगळ्या अँगलमधून शूट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हते.
तपासादरम्यान, आम्हाला आढळून आले की योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन न केल्याचा दावा खोटा आहे.
Result: False
Sources
X post by BJP’s Official X handle.
Video by Narendra Modi’s official Youtube channel.
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा