Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा...

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
लोकसभा निवडणुकीत यूपीमधील अनपेक्षित पराभवानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे.
Fact
एडिटेड व्हिडिओसह बनावट दावा केला जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 15 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ असे म्हणताना दिसत आहेत की, ”देश के संसाधनों पर पहला हक़ मुसलमानों का है। अब आप देश को मुसलमानों और गैर-मुसलमानों के नाम पर,अल्पसंख्यकों और बहुसंख्यकों के नाम पर बाँटना चाहते हैं … देश के संसाधनों पर पहला हक़ मुसलमानों का है।” व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, ‘उत्तर प्रदेश में बड़ी हार के बाद योगी आदित्यनाथ के सुर बदल गए हैं।’ अशा सोशल मीडिया पोस्टचे संग्रहण येथे आणि येथे पहा.

हे महत्वाचे आहे की, लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने 292 जागा मिळवून NDA आघाडीच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले असले तरी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी एकट्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी समाजवादी पक्षाने 36 जागा जिंकल्या असून भाजपच्या खात्यात फक्त 33 जागा गेल्या आहेत, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये 64 जागा जिंकल्या होत्या.

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या
Courtesy: FB/@ਖਾਲਿਦ ਜੀ
Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या
Courtesy: X/@NikitVerma07

Fact Check/ Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही प्रथम व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा रिव्हर्स इमेज शोध घेतला. यादरम्यान, आम्ही 23 एप्रिल 2024 च्या YouTube पोस्ट मध्ये हा व्हायरल व्हिडिओ पाहिला. यावरून हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले.

भारत एक्सप्रेस नावाच्या YouTube चॅनेलने व्हायरल क्लिपची एक मोठी आवृत्ती शेअर केली आणि व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ”मनमोहन सिंह ने किसके इशारे पर कहा देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है‘” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “CM YOGI का Congress पर हमला, किसके इशारे पर कहा, ‘देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का.”

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या
Youtube post by Bharat Express

आता आम्ही Google वर संबंधित कीवर्ड शोधले. याचा परिणाम म्हणून आम्हाला 23 एप्रिल 2024 रोजी Aaj Tak ने या व्हिडिओवर प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे म्हटले होते, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

व्हिडिओच्या लाँग व्हर्जनमध्ये योगी आदित्यनाथ म्हणताट की, “इनके समय में जब कांग्रेस का ये परिवार सुपर PM बना हुआ था, मनमोहन सिंह देश के प्रधानमंत्री थे उन्होंने किसके इशारे पर कहा था कि देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है…आप देश को मुसलमान और गैर मुसलमान के नाम पर, अल्पसंख्यक और बहुसंख्यक के नाम पर बांटना चाहते हैं?… देश को प्रधानमंत्री मोदी का धन्यवाद करना चाहिए जिनकी वजह से पिछले 10 साल में 25 करोड़ लोग गरीबी रेखा से उभरे हैं।” हा व्हिडिओ बनावट दाव्यांसह एडिट आणि शेअर केला जात आहे.

23 एप्रिल 2024 रोजी एएनआयने या व्हिडीओसह माहितीही दिली होती की, योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले होते की, “कोणाच्या सांगण्यावरून मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधान असताना देशाच्या संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला अधिकार असल्याचे सांगितले होते.”

योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधत दिलेल्या या विधानावर हिंदुस्थानने 23 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील मनमोहन सिंग यांच्या जुन्या विधानावरून राजकारण कसे सुरू झाले हे सांगितले आहे. मंगळवारी, 23 एप्रिल रोजी गोरखपूरमध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हिंदू-मुस्लिम, अल्पसंख्याक-बहुसंख्य या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 18 वर्षे जुन्या विधानावरून काँग्रेसविरोधात आघाडी उघडली होती, ज्यावरून राजकारण सुरू झाले होते, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर न्यूजचेकरने एप्रिल 2024 मध्ये लिहिलेला लेख येथे वाचता येईल.

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे? येथे सत्य जाणून घ्या
Report by Hindustan

Conclusion

तपासातून आम्ही निष्कर्षाप्रत पोहोचलो की योगी आदित्यनाथ यांचा एडिटेड व्हिडिओ बनावट दाव्यांसह व्हायरल होत आहे.

Result: Altered Photo/Video

Sources
Youtube post by Bharat Express on 23rd April 2024.
Youtube report by Aaj Tak on 23rd April 2024.
X post by ANI on 23rd April 2024.
Report by Hindustan on 23rd April 2024.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular