Authors
Claim
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली वाहिली.
Fact
व्हायरल चित्र संपादित केले आहे. मूळ चित्रात योगी आदित्यनाथ डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचा दावा करण्यासाठी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे.
हा दावा व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
टिपू सुलतानबद्दल वेगवेगळ्या विचारधारा मानणाऱ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. एकीकडे भाजप समर्थक अनेकदा सोशल मीडियावर टिपू सुलतानवर टीका करतात, तर दुसरीकडे वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक युजर्स टिपू सुलतानच्या राजवटीची प्रशंसाही करतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही टिपू सुलतान आणि काँग्रेसवर अनेकदा टीका केली आहे.
या क्रमाने, सोशल मीडिया युजर्स उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचा दावा करत एक फोटो शेअर करत आहेत.
Fact Check/ Verification
योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या नावाखाली शेअर केलेले हे छायाचित्र पडताळण्यासाठी आम्ही गुगलवर सर्च केले. प्रक्रियेत, आम्हाला व्हायरल चित्राची दुसरी आवृत्ती सापडली. तथापि, शोध परिणामांमध्ये, आम्हाला चित्रातील लोकांद्वारे किंवा कोणत्याही विश्वसनीय घटकाद्वारे शेयर केलेल्या कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत.
शोध प्रक्रियेतून मिळालेल्या निकालांमध्ये चित्राची आणखी एक आवृत्ती आहे, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा देखील दिसू शकतात. या फोटोमध्ये योगी आदित्यनाथ महाराणा प्रताप यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
व्हायरल पिक्चरमधून टिपू सुलतानचा फोटो काढल्यानंतर आणि गुगलवर सर्च केल्यावर, आम्हाला कळले की हे चित्र 2021 सालचे आहे, जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी डॉ भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली होती.
योगी आदित्यनाथ यांनी 29 जून 2021 रोजी प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये व्हायरल प्रतिमेची मूळ आवृत्ती शेअर केली होती, ज्यामध्ये ते टिपू सुलतान किंवा महाराणा प्रताप यांना नव्हे तर डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
दोन चित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर, आम्हाला असे आढळून आले की, प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ डॉ. भीमराव आंबेडकरांना आदरांजली वाहत होते, हे चित्र संपादित करून डॉ. आंबेडकरांच्या जागी टिपू सुलतानचे चित्र घालण्यात आले आहे.
Conclusion
त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली वाहण्याच्या नावाखाली केलेला हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. व्हायरल चित्र संपादित केले आहे. मूळ चित्रात योगी आदित्यनाथ डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत होते.
Result: Altered Video/ Photo
Our Sources
Facebook post shared by Yogi Adityanath on 29 June, 2021
Tweet shared by Dinesh Sharma 29 June, 2021
Newschecker analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in