सोशल मीडियात समीर वानखेडे आणि NCB टीमवर मुंबईतील गोरगाव येथे ड्रग्ज पॅडलर्सनी हल्ला केल्याच्या दाव्याने पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच या हल्ल्या बातमी एकाही माध्यमांत देखील प्रसिद्ध झाली नाही असाही दावा या हिंदीत लिहिलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
गोरगावमध्ये ड्रग पेडलर माल देण्यासाठी आला असता एनसीबीच्या पथकाने त्याला पकडून कारमध्ये बसवले.पेडरल ने कारमधून जोरात आरडाओरडा केला आणि काही क्षणातच 50-60 जणांच्या जमावाने एनसीबीच्या 6 सदस्यांवर प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने टीम स्तब्ध झाली, बचावासाठी आलेल्या दोन अधिकाऱ्यांना हल्लेखोरांनी घेरले. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी संयम दाखवला. बुद्धिमत्ता दाखवत स्वतःचा आणि टीमचा जीव तर वाचवलाच, पण पॅडलरला अटकही केली.
या अधिका-याने पेडलरच्या कपाळावर पिस्तूल लावून जमावाला हटण्यास होण्यास भाग पाडले, जमाव मागे हटला पण गाडीला घेराव घालत राहिला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून एनसीबीच्या पथकाने मुंबई पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पॅडरलला अटक करून सुखरूप परतले, मात्र समीर वानखेडे यांच्यासह दोन अधिकारी जखमी झाले.पण एवढ्या मोठ्या घटनेची माध्यमांनी साधी दखल देखील घेतली नाही. उद्धव ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांवर प्रश्नचिह्न उभे राहते. पोलिसांच्या नावाखाली एवढा मोठा ड्रग्जचा धंदा सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारलाही माहित देखील नाही.
.

Fact Check/Verification
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्यामुळे चर्चेत असलेेले एनसीबीची अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गोरगाव परिसरात ड्रग्ज पॅडलर्सनी हल्ला केला आहे का? माध्यमांनी या हल्ल्याच्या बातमीला खऱंच महत्व दिले नाही का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी काही किवर्डसचा वापर कला असता आम्हाला झी 24 तास ची बातमी आढळून आली मात्र ही बातमी मागील वर्षीची 23 नोव्हेंबर 2020 रोजीची आहे.
या बातमीत म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणानंतर एनसीबीची टीम ड्रग्ज कनेक्शनच्या शोधात आहे. त्यामुळे ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहे. ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. एनसीबीच्या 5 अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलरकडून हा हल्ला झालाय. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही घटना घडली. ड्रग्ज पेडलर्सच्या 50 ते 60 जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला.
समीर वानखेडेंच्या अंतर्गत एनसीबीती ही टीम मुंबईत काम करत आहे. हल्ला झाला त्यावेळी समीर स्वत: तिथे होते का ? याची माहिती समोर आले नाही. पण एनसीबीचे दोन अधिकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेयत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इतर 3 अधिकारी सुरक्षित आहेत.

याशिवाय टाईम्स नाऊ मराठीच्या वेबसाईटवरही या हल्ल्याची बातमी आढळून आली. या हल्ल्यात समीर वानखेडे देखील जखमी झाले असल्याचे बातमीत म्हटले आहे.

याशिवाय लोकमतची 24 नोव्हेंबर 2020 रोजीची बातमी देखील आढळून आली यात म्हटले आहे की, समीर यांच्या पत्नू आणि अभिनेत्री क्रांती रोडकर यांनी आपल्या पतीची तब्येत ठीक असल्याची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे.

Conclusion
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, समीर वानखेडे आणि एनसीबीच्या टीमवर हल्ला झाल्याची घटना सध्याची नाही तर मागील वर्षीची आहे. त्यावेळी या हल्ल्याच्या बातम्या देखील माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या.
Result: Misleading
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.