ठाकरे सरकारने मकदूम शाह दर्ग्यावर सलामी देण्याची परंपरा सुरू केली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात पोलिस पीर हजरत मकदूम शाह दर्ग्यावर सलामी देताना दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलामीची ही परंपरा सुरु झाली आहे. शिवसेना आता संपल्यात जमा आहे.

संग्रहित
Fact Check / Verification
ठाकरे सरकारच्या काळात मुंबई पोलिसांची मकदूम शाह दर्ग्यात सलामीची परंपरा सुरु झाली आहे का याचा आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली. असता City Headlines News या युट्यूब चॅनलवर 12 डिसेबर 2019 रोजीचा एक व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की, सालाबादप्रमाणे मकदूम शाह दर्ग्याचा उरुस सुरु झाला असून नेहमी प्रमाणे पहिली चादर चढविण्याचा मान मुंबई पोलिसां ना मिळाला.
याशिवाय आम्हाला लोकमित्र मुंबई या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आढळून आला, ज्यात व्हायरल व्हिडिओतील दृश्ये समान असल्याचे आढळून आले. हा व्हिडिओ 29 डिसेंबर 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.
अधिक शोध घेतला असता आम्हाला दुसरा जुना 2017 चा व्हिडिओ सापडला. मुंबई पोलिसांनी दिलेली सलामी यात पाहता येईल. हा व्हिडिओ 8 डिसेंबर 2017 रोजी अपलोड केला गेला.
पडताळणी दरम्मायान आम्हाला आढळून आले की, माहिमच्या मकदूम शाह दर्ग्यावर दरवर्षी होणा-या उरुसात मुंबई पोलिसांची सलामी देण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे. याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी त्याचा संबंध नाही.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, मुंबई पोलिसांकडून काही वर्षांपासून माहिमच्या दर्ग्यात चादर चढविली जात आहे. ही पंरपरा ठाकरे सरकारने सुरु केलेली नाही.
Result -Misleading
Our Sources
युट्यूब-https://www.youtube.com/watch?v=85grRxyDIL4
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.