नागपुरच्या दीक्षाभूमी समितीकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटी रुपयांचे दान सरकारला देण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, ऑक्सिजन प्लांट निर्मिती साठी दीक्षाभूमी येथून सरकार ला 120कोटी च दान. दीक्षाभूमी समिती चे खूप खूप आभार.



युटयुबवर देखील हेच दावे करणारे व्हिडिओ व्हायरल झाले असल्याचे आढळून आले.
crowdtangleवर या पोस्ट संदर्भात 156 इन्ट्रेक्शन्स आढळून आले आहेत
Fact Check/Verification
सध्या कोरोनाची स्थिति गंभीर झाल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना आॅक्सिजनची कमरता भासत आहे. अशातच अनेक लोक व संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. याच दरम्यान हा दावा व्हायरल झाला असल्याने दीक्षाभूमी समितीकडून खरंच 120 कोटी सरकारला आॅक्सिजन प्लांट निर्मितीसाठी दान दिले आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांत किंवा न्यूज वेबसाईट्सवर ही बातमी आढळून आली.
यानंतर आम्ही दीक्षाभूमीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. मात्र तेथे देखील आम्हाला 120 कोटी रुपयांचे दान दिल्याचा उल्लेख आढळून आला नाही.

अधिक शोध घेतला असता आम्हाला दीक्षाभूमी नागपूर इथली 120 कोटी दान दिल्याची बातमी खोटी असल्याची माहिती आकाश दादा शिरसाट सम्राट अशोक सेना अध्यक्ष यांनी दिल्याची पोस्ट एका फेसबुक पेजवर आढळून आली.

या संदर्भात अधिक तपास सुरु ठेवला असता आम्ही दीक्षाभूमीच्या फेसबुक पेजला भेट दिली असता आम्हाला ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूर’चे सचिव डॉ. सुधीर सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीच्या फेसबुक पेजवरून व्हायरल दाव्यांविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
फुलझेले यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे
“जय भीम, काही समाजमाध्यमांतून दीक्षाभूमीने ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी काही रक्कम दिल्याची खोडसाळ बातमी प्रसारित होत आहे. ही बातमी जर खरी असती तर दीक्षाभूमीला आणि सर्व समाजाला खूप आनंद झाला असता पण दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे.
दीक्षाभूमीने कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवायचा म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगर पालिका यांना पत्र लिहून कळवले आहे की दीक्षाभूमीवरील यात्री निवास आम्ही कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ. हेच एक दीक्षाभूमी कडून कोरोनाच्या विरुद्ध उचललेले एक पाउल आहे. धन्यवाद.”
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, दीक्षाभूमी समितीने आॅक्सिजन प्लांटसाठी सरकारला 120 कोटींचे दान दिलेले नाही.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Result: False
Claim Review: दीक्षाभूमी समितीकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटींचे दान Claimed By: Social Media post Fact Check: False |
Our Sources
दीक्षाभूमी फेसबुक पेज- https://www.facebook.com/493112994112166/videos/300651464965101
द महाराष्ट्र न्यूज- https://fb.watch/5ascQ1OMCG/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.